शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती संग्रहालयाचे वैभव परतले

By admin | Updated: May 18, 2016 03:17 IST

एकेकाळी नागपूरची ओळख असलेला ‘अजब बंगला’ म्हणजेच मध्यवर्ती संग्रहालयाने आता कात टाकली आहे.

अत्याधुनिक स्वरूपातील दालने : चित्रकला व नागपूर हेरिटेजमुळे आकर्षणात भर नागपूर : एकेकाळी नागपूरची ओळख असलेला ‘अजब बंगला’ म्हणजेच मध्यवर्ती संग्रहालयाने आता कात टाकली आहे. गेल्या काही वर्षांत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे या संग्रहालयाचे रूप पालटले आहे. येथील दालनांना अत्याधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. चित्रकला दालन व नागपूर हेरिटेजमुळे येथील आकर्षणात भर पडली आहे. पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता या संग्रहालयाचे गतवैभव पुन्हा परतल्याचा प्रत्यय येतो. ब्रिटिशांच्या काळात अ‍ॅन्टेक्वेरियन सोसायटी आॅफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस या संस्थेच्या गरजेनुसार नागपूर येथे संग्रहालय व ग्रंथालय स्थापन करावे, अशी संकल्पना पुढे आली. त्यानुसार नागपूरचे तत्कालीन मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल यांच्या सूचनेंतर्गत कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीमध्ये मुख्य आयुक्तांशिवाय फादर रेव्हरंड हिस्लॉप तसेच इतर उच्चपदस्थ युरोपियन अधिकारी व नागपुरातील एकमेव भारतीय नाना अहीरराव यांचा समावेश होता. स्थापित कमिटीने सन १८६२ मध्ये निर्देशित व निश्चित केलेल्या जागेवर आज अस्तित्वात असलेल्या संग्रहालयाची इमारत बांधण्यात आली व सेंट्रल म्युझियम नागपूर या नावाने ७ मे १८६३ मध्ये हे संग्रहालय सुरू झाले. ब्रिटिश काळात जी काही संग्रहालये निर्माण करण्यात आली त्यापैकी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय हे मध्य भारतातील सर्वात जुने व अग्रणी संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे हे १५३ वे वर्ष आहे. संग्रहालयात भूगर्भ व प्रागैतिहासिक, प्राणी (स्टफ), पक्षी, सरपटणारे प्राणी, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, पाषाणशिल्प, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती इत्यादी दालनांचा समावेश आहे. संग्रहालयात नागपूर हेरिटेज दालन नव्यानेच सुरू झाले आहे. या दालनात नागपूर जिल्ह्यातील विविधा वारसा स्थळाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. नागपूरच्या प्राचीन व आधुनिक स्थापत्यासोबतच मध्यवर्ती संग्रहालयाा दीडशे वर्षांच्या वाटचालीचा संक्षिप्त वृत्तांत सांगण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या नावाचे फलक लावले आहे. यात १८५७ व १९४२ च्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांचे नामस्मरण करण्यात आले आहे. काळाच्या ओघात झालेल्या बदलांचे वास्तविक चित्रण जुने आणि नवीन नागपूर या शोकेसमध्ये दर्शविण्यात आले आहे. यामध्ये सन १९६० ते १९७० च्या सुमारास नागपुरातील भारतीय रिझर्व्ह बँक, लक्ष्मीनारायण मंदिर, मध्यवर्ती संग्रहालय, रेल्वे स्टेशन इत्यादी प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे भूतकाळ आणि वर्तमानकाळ या पद्धतीने दाखविण्यात आली आहेत. संग्रहालय परिसरात लॅण्डस्केपिंग करून काही प्राचीन मूर्र्ती स्थापित करून नवीन दालने तयार करण्यात आली आहेत. याशिवाय अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या राणी व्हिक्टोरिया यांच्या दोन्ही संगमरवरच्या मूर्तीसुद्धा येथे स्थापित करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवनवीन कार्यक्रमांद्वारे पर्यटकांची संख्यासुद्धा कमालीची वाढली आहे. (प्रतिनिधी)