शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात भुरूविरुद्ध खटल्यास प्रारंभ

By admin | Updated: June 28, 2014 02:43 IST

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टी येथील कुख्यात शेख अकरम ऊर्फ भुरू आणि टोळीविरुद्ध ...

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टी येथील कुख्यात शेख अकरम ऊर्फ भुरू आणि टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात शुक्रवारपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात खटल्याची सुनावणी प्रारंभ झाली. पहिल्याच दिवशी एका साक्षीदाराची साक्ष झाली. त्याची सरतपासणी साक्ष अर्धवट राहिली. ३० जूनपर्यंत या खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात आली. या खटल्यात अनुप अण्णाजी भोसले, शेख अकरम ऊर्फ भुरा ऊर्फ भुरू डॉन शेख रहेमान, आॅस्कर आॅस्टिन जोसेफ, कमलेश ऊर्फ पप्पू द्वारकाप्रसाद गुप्ता, सचिन केशरसिंग ठाकूर आणि विशाल नारायण रेड्डी हे आरोपी आहेत. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, भुरू हा वसंतराव नाईक झोपडपट्टीत जुगार आणि मादक पदार्थाचा अड्डा चालवायचा. त्याची व टोळीची या झोपडपट्टीत दहशत होती. २४ सप्टेंबर २०१२ जुगारातील पैशाच्या देवाणघेवाणीवरून या टोळीने रोहित जैन नावाच्या एका तरुणाला आर्वी येथून इनोव्हा कारने अपहरण करून वसंतराव नाईक झोपडपट्टीतील अड्ड्यावर आणले होते. त्याला भुरूने आपल्या ‘पीसीआर’ रूममध्ये नेऊन चामडी पट्ट्याने अमानवीय मारहाण केली होती. मारहाणीतच रोहित याचा मृत्यू झाला होता. पुढे त्याचा मृतदेह भुरू आणि साथीदारांनी एका झोपडीत खड्डा करून पुरून टाकला होता. ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रोहितचा मृतदेह काढण्यावरून भुरूचे मोहल्ल्यातील लोकांसोबत भांडण झाले होते. त्याने काही जणांवर तलवारीने हल्ला केला होता. परिणामी मोहल्ल्यातील लोकांनी एकजूट करून भुरूच्या या साम्राज्याविरुद्ध एक प्रकारचा उठाव केला होता. संतापलेल्या जमावाने केलेल्या हल्ल्यात भुरूचा भाऊ इक्बाल हा ठार झाला होता तर भुरू स्वत:चा जीव वाचवून पळून गेला होता. या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल होऊन सहायक पोलीस आयुक्त पी. पी. धरमशी यांनी तपास केला होता. जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे हे हा खटला चालवीत आहेत. बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अविनाश गुप्ता, अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर आणि अ‍ॅड. पराग उके हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)