शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा

By गणेश हुड | Updated: September 18, 2025 18:43 IST

शेतकरी संघटनेची मागणी :अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे खरीप पिक व भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात शासनाने एनडीआरएफचे निकष बाजुला सारून एकरी ५० हजार रुपये मदत तातडीने जाहीर करावी.केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी  राज्य सरकारने तातडीने कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललीत बहाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. 

बहाळे म्हणाले की, “दरवर्षी नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात वाढ व बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले असून आत्महत्येच्या घटनाही घडत आहेत. या परिस्थितीत  सरकारने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरची सर्व कर्जाची नोंद पुसून सातबारा कोरा करून कर्जमुक्ती जाहीर करावी. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा बहाळे यांनी दिला. 

शेतकरी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी महाराष्ट्रातील एसबीटी बियाण्यांवरील बंदीवर ताशेरे ओढले.एसबीटी बियाणे ही सुधारित बियाण्यांची श्रेणी आहे जी पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक उत्पादन देणारी आहे. "गुजरात-आंध्रात वापरास बंदी नाही, मग महाराष्ट्रातच अडथळा का? राज्य सरकारने प्रायोगिक वापरासाठी केंद्राकडे परवानगी मागावी," अशी त्यांनी मागणी केली. २९ सप्टेंबर २०२५ शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

यावेळी माजी आमदार सरोज काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, शेतकरी युवा आघाडीचे अॅड. दिपक चटप, सतीश दाणी, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख राजाभाऊ पुसदेकर, राजकुमार धोटींग, श्रीकांत दौलतकर, अरुण केदार आदी उपस्थित होते. 

डिसेंबरमध्ये अधिवेशन

शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, युवा आघाडी, स्वतंत्र भारत पक्षातर्फे शेतकरी, शेतमजूर, युवक, व्यापारी, छोटे उद्योजक व महिलांचे व महिला बचत गटांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी १० ते १२ डिसेंबर २०२५ ला यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती ललीत बहाळे यांनी दिली. 

शेतकरी संघटनेच्या मागण्या

  • हवामान प्रतिरोधक, पौष्टीक व औषधी गुणधर्म असलेल्या बियाण्यांवरील संशोधनाला परवानगी द्या.
  • शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोअरची अट तातडीने रद्द करा.
  • कापसावरील ११ टक्के आयात शुल्क पुन्हा लागू करा आणि संपूर्ण कापूस बिनशर्त खरेदी करा.
  • बाजार समित्यांत व खरेदी केंद्रांत नोंदणी सुविधा सुरू करा.
  • तेल, वाटाणा, तूर व कडधान्यावरील आयात शुल्क वाढवा.
  • वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान शासनाने भरून द्यावे.
  • सर्प दंशामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई द्या.
टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूर