शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या विकासावर होणार महाचर्चा

By admin | Updated: September 6, 2016 02:20 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हिजन २०२०’ (नागपूरचा विकास :

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी होणार सहभागीनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हिजन २०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी कामठी रोड येथील ईडन ग्रीन्झ् येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता या परिषदेचे उद्घाटन होईल. नागपूर शहरातील नागरी प्रश्न, समस्या, पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध विकासाची गरज, भविष्यातील आव्हाने, मनपा-नासुप्र, सरकार आणि नागरिकांची जबाबदारी आदी विषयांवर एकूण चार चर्चासत्रांत या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी ४ वाजता परिषदेचा समारोप होईल. उद्घाटन समारंभाला राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास आणि गृह (शहर) राज्यमंत्री रणजित पाटील, खा.अजय संचेती (राज्यसभा सदस्य) रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, खा.विकास महात्मे (राज्यसभा सदस्य) आणि महापौर प्रवीण दटके परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या परिषदेला आ.जोगेंद्र कवाडे, आ.अनिल सोले, आ.प्रकाश गजभिये, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकरराव देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, आ.सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, एम.ए.डी.सी.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम्, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि ‘आॅरेंज सिटी वॉटर’चे मुख्य प्रवर्तक अरुण लखानी प्रामुख्याने उपस्थित राहातील.