शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिडीओ गेम’मधून ‘गेट! सेट! व्होट!’

By admin | Updated: October 6, 2014 00:55 IST

लोकशाही प्रणालीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे यासाठी सर्व स्तरांवरून आवाहन करण्यात येत आहे. युवा मतदारांना डोळ्यासमोर

मतदार जागृती: केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाऊल नागपूर : लोकशाही प्रणालीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे यासाठी सर्व स्तरांवरून आवाहन करण्यात येत आहे. युवा मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय निवडणूक आयोगाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. आपल्या देशातील मतदानपद्धती आणि लोकशाहीच्या मूल्यांची माहिती चक्क आता एका ‘व्हिडीओ गेम’च्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. ‘गेट!सेट! व्होट!’ असे या ‘गेम’चे नाव असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या काळात याला ‘लॉन्च’ करण्यात आले आहे. ‘एन्टरटेन्मेन्ट कम एज्युकेशन’ असे या ‘गेम’चे स्वरूप आहे.जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता निवडणूक आयोगाकडून निरनिराळ्या मोहिमा नेहमीच राबविण्यात येतात. यात सोशल नेटवर्किंग, तंत्रज्ञान यांचीदेखील मदत घेण्यात येते. तरुण मतदारांची संख्या लक्षात घेता हा अनोखा ‘व्हिडीओ गेम’ तयार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या ‘एसव्हीईईपी’ उपक्रमांतर्गत (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन अ‍ॅन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा ‘व्हिडीओ गेम’ बनविण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हा ‘गेम’ उपलब्ध असून त्याला संगणकावर ‘डाऊनलोड’ करण्याची सोयदेखील यामध्ये आहे.‘कॉमिक्स’ , ‘रेडिओ’ व आता ‘गेम’निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी याअगोदर निरनिराळी पावले उचलली आहेत. केवळ मतदार व नवमतदारच नाही तर अगदी शाळकरी विद्यार्थ्यांसाठीदेखील ‘कॉमिक्स’, ‘पिक्चर बुक्स’, ‘रेडिओ’ इत्यादींच्या माध्यमातून आयोगाने पुढाकार घेतला. ‘प्राऊड टू बी व्होटर’, ‘गर्व से बने मतदाता’ नावाची ‘पिक्चर बुक्स’, ‘रेडी! स्टेडी! व्होट!’ आणि ‘व्होट की बाजी’ नावाचे ‘बोर्ड गेम’ व ‘लोकतंत्र एक्सप्रेस’ नावाचा ‘रेडिओ’ कार्यक्रम यांचा यात समावेश आहे.(प्रतिनिधी)कसा आहे ‘गेट! सेट! व्होट!’?‘गेट सेट व्होट’ नावाचा हा ‘व्हिडिओ गेम’ जास्तीत जास्त रोचक व संवादात्मक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात एकूण १० ‘लेव्हल’ असून प्रत्येक टप्प्यानंतर मतदान तसेच लोकशाही प्रणालीबद्दल अतिशय चांगली व उपयोगी माहिती व तथ्य समोर येतात. प्रत्येक ‘लेव्हल’ सोबत गेममधील आव्हाने आणखी वाढत जातात व समोर येणारी माहिती जास्तीत जास्त सखोल होत जाते. यात भारतीय लोकशाही प्रणाली, मतदान कसे करावे, मतदार नोंदणी, नैतिक मतदान, निवडणूक आयोगाकडून मदत इत्यादी बाबींचा समावेश आहे. हा ‘गेम’ खेळल्यानंतर मतदानासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे मतदाराला आपोआप मिळतात आणि म्हणूनच याचे नाव ‘गेट सेट व्होट’ असे ठेवण्यात आले आहे.