गॅस टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST2021-02-18T04:14:53+5:302021-02-18T04:14:53+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : मार्गात वळण घेताना अनियंत्रित झालेला टँकर उलटला. त्यात टँकरखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

The gas tanker overturned | गॅस टँकर उलटला

गॅस टँकर उलटला

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : मार्गात वळण घेताना अनियंत्रित झालेला टँकर उलटला. त्यात टँकरखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सावनेर हेटी-काटाेल बायपास मार्गावर बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

फिराेज अजहूल हक (२२, रा. मजगाव, उत्तर प्रदेश) असे मृत टँकरचालकाचे नाव आहे. फिराेज हक हा एमएच-४०/बीएल-४४२७ क्रमांकाचा गॅस टँकर घेऊन बैतुल येथून नागपूर एमआयडीसी येथे जात हाेता. दरम्यान, सावनेर परिसरातील हेटी-काटाेल बायपास मार्गावर वळण घेताना अनियंत्रित झालेला टँकर उलटल्याने त्याखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावनेर पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. हितेश बन्साेड यांच्या मदतीने पाेलिसांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी सावनेर पाेलिसांनी नाेंद केली असून, ठाणेदार अशाेक काेळी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पाेलीस हवालदार बाेरकर करीत आहेत.

Web Title: The gas tanker overturned