शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कचरा घोटाळा, कंत्राट रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांच्या कचरागाडीत माती व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांच्या कचरागाडीत माती व दगड आणून वजन वाढवून घोटाळा केला जात असल्याचे उघडकीस आले होते. यात दंड आकारण्यात आला. घोटाळा सिद्ध झाल्याने प्रकरणात एफआयआर दाखल करून कंपन्यांचे कंत्राट रद्द करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिले. सोबतच गतकाळात गाजलेल्या भंगार व एलईडी पथदिव्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

नागपूर येथील विधानभवनात विधिमंडळ सचिवालयाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी झाले. त्यानंतर पहिल्याच बैठकीत नाना पटोले यांनी नागपूर महापालिकेच्या विविध विभागातील घोटाळे व तक्रारींचा आढावा घेतला. यावेळी आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, नगरसेवक संजय महाकाळकर, संदीप सहारे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नासुप्रच्या सभापती शीतल उगले यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

विकास ठाकरे यांनी भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे कचऱ्याचे ट्रक खाली करताना कचऱ्यात माती मिसळून कोट्यवधी रुपयाचा कचरा घोटाळा उघडकीस आणला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. या प्रकरणात कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना दंड आकारण्यात आला. यात आता एफआयआर दाखल करून कंत्राट रद्द करण्याचे आदेश पटोले यांनी दिले.

मनपातील भंगार घोटाळ्यात पाच अधिकारी निलंबित करण्यात आले होते. तर एलईडी दिवे खरेदी प्रकरणातही घोटाळा झाल्याची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी केली होती. सभागृहातही हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश नाना पटोले यांनी मनपा आयुक्तांना दिले.

....

नकाशा मंजुरीची अट शिथिल करा

रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत स्लम भागातील लोकांना घरकुल उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना नकाशा मंजूर असेल तरच लाभ मिळतो. अनेकांच्या घराचे बांधकाम ३०० फुटाच्या आत आहेत. अनेकांना मालकी पट्टे मिळालेले नाही. यामुळे नकाशा मंजुरी मिळत नसल्याचे संजय महाकाळकर यांनी निदर्शनास आणले. यावर तोडगा काढण्याचे आदेश पटोले यांनी नासुप्र व मनपा अधिकाऱ्यांना दिले.