शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम कुटुंबाच्या घरात आरतीसोबतच नमाज पठणही, सोहेल खान करताहेत सर्वधर्म - समभावाचे जतन

By कमलेश वानखेडे | Updated: September 3, 2022 08:02 IST

Ganesh Mahotsav:

- कमलेश वानखेडेनागपूर : गणराया म्हणजे चैतन्याचे, उत्साहाचे प्रतीक; पण नागपूरच्या सोहेल खान यांनी गणरायाला सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले. मुस्लीम असूनही गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या घरी गणरायाची स्थापना करीत आहेत. त्यांचे कुटुंबीयही  मोठ्या भक्तिभावाने दहा दिवस  गणेशाची विधीवत पूजाअर्चा व भक्ती करतात. त्यांच्या घरी होणाऱ्या या उत्सवात त्यांचे शेजारीदेखील पूर्ण भक्तिभावाने सहभागी होतात. 

हे करताना सोहेल खान व त्यांचे कुटुंबीय आपल्या मुस्लीम धर्माच्या पाच वेळेच्या नमाजदेखील नित्यनेमाने करतात. त्यांच्या घरी ज्या हॉलमध्ये गणपती विराजमान आहे, त्याच हॉलमध्ये  बाजूला नमाजही सुरू असते. त्यामुळे भक्तीचे एक वेगळे दर्शन आपल्याला नागपूरच्या खान कुटुंबीयांच्या घरी पाहायला मिळते. त्यामुळे गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच कशा प्रकारे समाजात प्रेम, एकता, बंधुता निर्माण करण्याचे एक माध्यम आहे, हे दिसून येते. सोहेल खान राहतात तिथे बहुतांश हिंदू व इतर समाजाचे लोक राहतात. मात्र, गणेशोत्सवातील दहा दिवस त्यांच्या शेजारी राहणारे व परिसरातील हिंदू लोक कुटुंबासह या उत्सवात सहभागी होतात. आरतीला उपस्थित राहतात. घरून प्रसाद आणतात. संस्कृतीची ही खरी ओळख असल्याची भावना शेजारी व्यक्त करतात.

मुलाचा आग्रह,  पित्याने पूर्ण केला- सोहेल खान हे नागपूरच्या पार्वतीनगर, रामेश्वरी भागात राहतात. त्यांचा मुलगा सीझान खान याला गणपतीबद्दल एक वेगळी आपुलकी व प्रेम आहे. सुरुवातीला सीझान हा मातीचा गणपती स्वतः तयार करून घरी त्याची स्थापना करायचा. - त्यानंतर त्याने  घरी दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी वडिलांकडे मागितली. - वडिलांनीही कसलाच संकोच न करता मुलाला गणेशाची स्थापना करण्याची परवानगी दिली. तेव्हापासून हे कुटुंब गणेशोत्सव साजरा करत आहे.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवnagpurनागपूर