शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार

By admin | Updated: September 5, 2016 02:31 IST

कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य जानेवारी २०१७ मध्ये उजळणार आहे.

प्रशासनाची तयारी : जानेवारीपासून धावणार अधिक रेल्वेगाड्यादयानंद पाईकराव/ आनंद शर्मा  नागपूरकोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य जानेवारी २०१७ मध्ये उजळणार आहे. रेल्वे प्रशासनाने या प्लॅटफार्मवरून जानेवारी महिन्यात अधिकाधिक रेल्वेगाड्या चालविण्याची तयारी सुरू केली आहे. मागील अनेक वर्षांपासून कासवगतीने नागपूर-कळमना डबलिंगचे काम सुरु आहे. यामुळे होम प्लॅटफार्मवरून केवळ दोनच गाड्या चालविण्यात येत होत्या. परंतु हे डबलिंगचे काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे लवकरच होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांच्या कार्यकाळात आठ कोटी रुपये खर्चून नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात आठवा होम प्लॅटफार्म साकारण्यात आला होता. येथे कार टु कोचची सुविधा देण्यात येत आहे. या प्लॅटफार्मवर सुंदर दिवे, ऐतिहासिक वस्तू, नॅरोगेज कोचमध्ये उपहारगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय ब्रिटिशकालीन आग विझविण्याचे यंत्रही येथे ठेवण्यात आले आहे. परंतु कोट्यवधी रुपयांच्या या प्लॅटफार्मचा वापर फक्त दुरांतो एक्स्प्रेससाठीच होत होता. सध्या या प्लॅटफार्मवरून दोनच रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. होम प्लॅटफार्मवरून अधिकाधिक रेल्वेगाड्या चालविल्यास इतर प्लॅटफार्मवरील ताण कमी होऊन रेल्वेगाड्यांना आऊटरवर उभे करण्याची पाळी येणार नाही. यामुळे रेल्वेगाड्या वेळेवर चालविण्यास मदत होणार आहे. या समस्येची नव्याने पदभार स्वीकारलेले ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. नागपूर-कळमना डबलिंगच्या प्रकल्पाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली. यात सामूहिक प्रयत्न करून हे डबलिंगचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे डबलिंगचे काम पूर्ण झाल्यास होम प्लॅटफार्मवरून जास्तीत जास्त रेल्वेगाड्या चालविण्यात येणार असून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वेगाड्यांना याच प्लॅटफार्मवरून मुंबईकडे रवाना केले जाणार आहे. त्यासाठी आता जानेवारी महिन्यापर्यंतच वाट पाहावी लागणार आहे.‘होम प्लॅटफार्मवरून जानेवारी महिन्यात सर्वाधिक रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनातर्फे सुरू आहे. त्यासाठी नागपूर-कळमना डबलिंगचा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाशी संपर्क साधून चर्चा करीत आहे. हे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.’- बृजेश कुमार गुप्ता,‘डीआरएम’, मध्य रेल्वे नागपूर विभाग.