शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांच्या थकीत देयकांसाठी १६८० कोटी रुपयांचा निधी मंजूर; दहा महिन्यांपासून रखडली देयके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:32 IST

राज्य कंत्राटदार महासंघाच्या पाठपुराव्याला यश : जलजीवन मिशनसाठी १६८० कोटींचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या थकीत देयकांसाठी शासनाकडून १६८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्याध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जवळपास दहा महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांची जलजीवन मिशनच्या कामांची देयके थकली आहेत. या काळात संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. शासनाशी झालेल्या अनेक चर्चाअंती अखेर १६८० कोटींचा निधी मंजूर झाला. हा निधी आम्ही शासनाकडून अक्षरशः खेचून आणला आहे, असे भोसले यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत सुमारे १२,५०० कोटी रुपयांची देयके अद्यापही प्रलंबित आहेत. या देयकांची तातडीने पूर्तता व्हावी, यासाठी पुढील काळातही संघटना संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जलजीवन मिशन ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना असून, दोन्हींकडून प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलला जातो. मात्र, चुकीच्या अंदाजपत्रकांमुळे आणि कामांतील विसंगतींमुळे अनेक ठिकाणी कंत्राटदारांना अडचणींना सामोरे जावे लागले. राज्य आणि केंद्रस्तरावर झालेल्या बैठकींमध्ये आम्ही आमच्या मागण्या ठामपणे मांडल्या. आमच्या पाठपुराव्यामुळेच शासनाला निर्णय घ्यावा लागला. उर्वरित निधीसाठीही आम्ही लवकरच पुढील पावले उचलू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Funds Approved for Contractors' Dues Under Jal Jeevan Mission

Web Summary : ₹1680 crore sanctioned for contractors' pending Jal Jeevan Mission dues after ten months. Contractor association continues efforts for remaining ₹12,500 crore. The joint central and state government initiative faces challenges due to budget discrepancies.
टॅग्स :nagpurनागपूरMONEYपैसा