शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसिमियाग्रस्तांना मोफत ‘नॅट टेस्टेड’ रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:39 IST

डॉ. हेडगेवार रक्तपेढीने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने समाजातील सर्व रुग्णांना विविध प्रकारच्या सवलती रक्तपेढी देणार आहे.

ठळक मुद्देहेडगेवार रक्तपेढीचा पुढाकार : रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. हेडगेवार रक्तपेढीने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने समाजातील सर्व रुग्णांना विविध प्रकारच्या सवलती रक्तपेढी देणार आहे. थॅलेसिमियाच्या ५२ रुग्ण रक्तपेढीने दत्तक घेतले आहे. या रुग्णांना दरमहा १०० ते १२५ रक्तपिशव्यांचे नि:शुल्क रक्तपुरवठा करते. आता या रुग्णांना मोफत ‘नॅट’(न्यूलिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नालॉजी) तपासलेले म्हणजे १०० टक्के सुरक्षित रक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच इतर रुग्णांना ‘नॅट टेस्टेड’ रक्ताच्या किमतीमध्ये काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.अशोक पत्की म्हणाले, नॅट टेस्टेड’ रक्तामुळे संक्र मणातून एचआयव्ही आणि कावीळ यासह अन्य विषाणूजन्य आजार होण्याचा धोका राहत नाही. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षित रक्त मिळण्याची शाश्वती असते. यामुळेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून थॅलेसिमियाच्या रुग्णांना हे रक्त मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच इतर रुग्णांसाठी नॅट टेस्टेड रक्ताचे दर कमी करून रुग्णांना दिलासाही दिला जाणार आहे. या रौप्यमहोत्सवात रक्तपेढीतर्फे महिलांचे रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. विदर्भात सहा ठिकाणी रक्त साठवणुकीची केंद्रे आहेत. लवकरच रामटेक, ब्रम्हपुरी, चंद्रपूर व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जामठा येथे साठवणूक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढी समाजाभिमुख रक्तपेढी आहे. यामुळे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर काम करते, असेही ते म्हणाले.पत्रपरिषदेत डॉ. विजयकुमार तुंगार, प्रकाश कुंटे, सुधीर बापट, प्रकाश कुंडले, मोहन गोखले, शंकरराव गद्रे, शंकरराव विंचूरकर, हरिभाऊ इंगोले, डॉ. कारगीरवार, डॉ. किशोर पंडित, प्रवीण पाटील उपस्थित होते.सिकलसेल रुग्णांनाही मिळणार ‘नॅट टेस्टेड’ रक्तएका प्रश्नाच्या उत्तरात अशोक पत्की म्हणाले, थॅलेसिमियाच्या रुग्णांसोबतच सिकलसेलच्या गरजू रुग्णांना ‘नॅट टेस्टेड’रक्त उपलब्ध करून देण्याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु थॅलेसिमियाच्या रुग्णांच्या तुलनेत या रुग्णांना कमी रक्त लागते. यामुळे थॅलेसिमियाच्या रुग्णांना प्राधान्य देण्यात आले आहे.