शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू दारात असूनही नागपूर शहरात सुपर स्प्रेडर्सचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 21:23 IST

Coronavirus Nagpur news; मृत्यू दारात असूनही नागपूर शहरात कंटेन्मेंट भागातील नागरिकांचा शहरात मुक्तसंचार सुरू आहे. अशा सुपर स्प्रेडर्समुळे इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देइतरांचा जीव धोक्यातकंटेन्मेंट झोन क्षेत्रातील नागरिकांकडून नियमांचे उल्लघन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात दररोज ४ ते ५ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यूचा आकडा ६५ ते ७५ पर्यंत पोहचला आहे. संक्रमण चेन ब्रेक करण्यासाठी कोविड नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. मनपा प्रशासनाकडूनही यासाठी वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र मृत्यू दारात असूनही कंटेन्मेंट भागातील नागरिकांचा शहरात मुक्तसंचार सुरू आहे. अशा सुपर स्प्रेडर्समुळे इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

शहरात गृहविलगीकरणात ६० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. शहराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असलेल्या १७५ भागांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. यात दररोज भर पडत आहे. टिन लावून काही वस्त्या सील करण्यात आलेल्या आहेत. परंतु पहिल्या लाटेत हॉटस्पॉट परिसर सील केल्यानंतर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.

गोदरेज आनंदम हाऊसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हा परिसर हॉटस्पॉट घोषित करून सील करण्यात आला आहे. परंतु आनंदममधील नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. क्रिकेटही खेळणे सुरू आहे. यासंदर्भात धंतोली झोनने आनंदमला नोटीस बजावली आहे. शहरातील अन्य हॉटस्पॉट भागातही अशीच परिस्थिती आहे. अशा भागातील नागरिकांनी स्वत: आपण इतरांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

हॉटस्पॉट भागातील नागरिकांची चाचणी व्हावी

कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट भागातील नागरिकांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवून त्यांची कोरोना चाचणी केली जात होती. यामुळे संक्रमण चेन ब्रेक होण्याला मदत झाली. सतरंजीपुरा, मोमिनपुरा अशा भागातील संक्रमणाला आळा घालणे शक्य झाले. परंतु सध्या अशी सक्षम यंत्रणा कार्यरत नाही. हॉटस्पॉट भागातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु सध्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील नागरिकांची कोरोना चाचणी झाली की नाही, याचीही झोन कार्यालयाकडून विचारणा होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस