शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्स अन् जर्मनी उचलणार मेट्रोच्या कर्जाचा भार

By admin | Updated: June 13, 2015 02:53 IST

नागपूर मेट्रो साकारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कर्जाचा प्रश्न आता जवळपास मिटला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रगतीचा आढावा नागपूर : नागपूर मेट्रो साकारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कर्जाचा प्रश्न आता जवळपास मिटला आहे. फ्रेंच डेव्हलपमेंट कंपनी (एएफडी) व जर्मन सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत केएफडब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेने मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी लागणारे संपूर्ण कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. कर्ज वितरणाऱ्या अटी व शर्तींवर चर्चा करण्यासाठी २४ जून रोजी दिल्ली येथे केएफडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात कर्जपुरवठ्याशी संबंधित बऱ्याच बाबी स्पष्ट होतील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रामगिरी येथे एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्याकडून मेट्रो रेल्वेच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. या चर्चेत दीक्षित यांनी संपूर्ण कर्ज देण्याबाबत फ्रान्स व जर्मनी या दोन्ही देशातील कंपन्यांनी तयारी दर्शविल्याचे स्पष्ट केले. आजवर संबंधित दोन्ही देशाच्या कंपन्या कर्जाचा काही भाग देण्यास तयार होत्या. मात्र, मेट्रो प्रकल्पाला मिळालेली गती, राज्य व केंद्र सरकारकडून घेतले जाणारे सकारात्मक निर्णय पाहता संबंधित कंपन्यांनी आता संपूर्ण ४५२१ कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. जर्मन सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत केएफडब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएमआरसीएल) कार्यालयाला भेट देत कमी व्याजदरात कोट्यवधींचा आर्थिक पुरवठा करण्याची तयारी दर्शविली होती. या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेत एनएमआरसीएलच्या साईटला भेट दिली होती. आता २४ जून रोजी दिल्ली येथे केएफडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांसोबत मेट्रो रेल कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)डीएमआरसीची चमू १६ ला येणारदिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनची चमू १६ जून रोजी नागपुरात येत आहे. ही चमू पुन्हा एकदा साईटची पाहणी करेल. सोबतच तांत्रिक बाबींवर चर्चा होईल. दरम्यान, मेट्रो रेल्वेसाठी अंतर्गत सल्लागाराचे काम करीत असलेल्या ‘राईट्स’च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली. भविष्यात काढावयाच्या निविदा, करावयाची कामे आदी बाबींवर त्यांनी दीक्षित यांच्याशी चर्चा केली.