शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध विदर्भ घडविण्याचा फॉर्च्युन फाऊं डेशनचा संकल्प

By admin | Updated: January 7, 2015 00:58 IST

बेरोजगार युवकांनी स्वत:च्या पायावर उभे करून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याचा संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशनने केल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी मंगळवारी दिली.

अनिल सोले यांची माहिती : यूथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन नागपूर : बेरोजगार युवकांनी स्वत:च्या पायावर उभे करून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याचा संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशनने केल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी मंगळवारी दिली. शिक्षक सहकारी बँकेच्या गांधीसागर येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, डॉ. उल्हास फडके, नितीन खर्चे व पंकज भोयर आदी उपस्थित होते. सध्या बेरोजगारांचा प्रश्न गंभीर आहे. युुवकांच्या हाताला काम देणारी यंत्रणा कमी पडत आहे. विदर्भ विकासाच्या बाबतीत मागे पडत आहे. ही बाब विचारात घेता बेरोजगारांना काम व विदर्भ विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशन आयोजित व नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन , मिहान, नॅशनल रुरल व अर्बन लाईव्हलीहूड मिशन यांच्या विशेष सौजन्याने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१४ दरम्यान कोराडी मार्गावरील मानकापूर स्पोर्टस् स्टेडियम येथे यूथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. यात देशभरातील तज्ज्ञाकडून एक हजाराहून अधिक स्वयंरोजगार व व्यवसायसंबधी विस्तृत माहिती दिली जाणार आहे. विदर्भातील कृषी, उद्योग, सेंद्रीय शेती, व्यवस्थापन, मार्केटिंग, स्पर्धा परीक्षा, कोणता अभ्यासक्रम घ्यावा, अशा विविध बाबींची माहिती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)