शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
4
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
5
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
6
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
7
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
8
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
9
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
10
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
11
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
12
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
13
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
14
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
15
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
16
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
17
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
18
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
19
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
20
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
Daily Top 2Weekly Top 5

वन विभाग म्हणतो, ‘वाघ’ सुरक्षित

By admin | Updated: May 16, 2014 00:47 IST

एकीकडे कळमेश्‍वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गायब झाल्याची जोरदार चर्चा असताना, नागपूर वन विभाग मात्र येथील सर्व वाघ सुरक्षित असल्याचे सांगत आहे.

अधिकारी हादरले : घटना दडपण्याचा प्रयत्न

नागपूर : एकीकडे कळमेश्‍वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गायब झाल्याची जोरदार चर्चा असताना, नागपूर वन विभाग मात्र येथील सर्व वाघ सुरक्षित असल्याचे सांगत आहे. मात्र या संपूर्ण घटनेने अख्खा वन विभाग हादरला आहे.

नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. के. महाजन यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कातलाबोडी जंगलातील सर्व वाघ सुरक्षित असून, त्यांचे छायाचित्रही वन विभागाकडे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या माहितीनुसार सर्व वाघ सुरक्षित असेल तर नक्कीच आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे,

परंतु वन विभागाने अजूनपर्यंंत त्या दिशेने कोणतीही चौकशी सुरू केल्याचे दिसून येत नाही. केवळ दक्षता विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रदीप मसराम यांनी चार दिवसांपूर्वी एका संयशिताला ताब्यात घेऊन, त्याची दिवसभर कसून चौकशी केली होती. परंतु त्यात त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. जाणकारांच्या मते, या जंगलात एक वाघ, एक वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा अधिवास आहे. मात्र गत दोन ते अडीच महिन्यापासून त्यापैकी एक वाघ अचानक गायब झाल्याची सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी ‘कातलाबोडीतील वाघ गायब’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून, या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला होता. माहिती सूत्रानुसार, लोकमतच्या या बातमीची वन मुख्यालयाने गंभीर दखल घेऊ न संबंधित वन अधिकार्‍यांकडून घटनेविषयी सविस्तर माहिती मागितल्याचे सांगितले जात आहे. नागपूर वन विभाग मात्र अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे सांगत आहे. पण दुसरीकडे मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली असून, या परिसरातील मुरली या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतातील धुर्‍यावर त्या वाघाला गाडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.