पदवीधरमध्ये प्रथमच मतदार यादी संकेतस्थळावर

By Admin | Updated: June 14, 2014 03:04 IST2014-06-14T03:04:07+5:302014-06-14T03:04:07+5:30

सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील मतदारांची यादी ...

For the first time in the graduate website on the voters list | पदवीधरमध्ये प्रथमच मतदार यादी संकेतस्थळावर

पदवीधरमध्ये प्रथमच मतदार यादी संकेतस्थळावर

नागपूर: सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील मतदारांची यादी ‘आॅनलाईन’ उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य राज्यात फक्त नागपूर

विभागीय आयुक्त कार्यालयानेच पेलले आहे. यामुळे मतदारांची सोय होणार आहे.
राज्यात पाच जागी पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. यात नागपूर, औरंगाबाद व पुणे विभागात पदवीधर तर पुणे व अमरावती विभागात शिक्षक

मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. नागपूर विभागात होत असलेल्या पदवधीरच्या निवडणुकीसाठी २० जूनला मतदान होणार असून २४ जूनला मतमोजणी होणारआहे.

यात एकूण १४ उमेदवार उभे असून जवळपास २ लाख ८० हजार मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याने घोळ झाला होता. नावे

यादीत आहेत किंवा नाही हे तपासून पाहण्याची जबाबदारी ही मतदारांची आहे, असे स्पष्टपणे आयोगाने बजावले होते. या पार्श्वभूमीवर पदवीधरांची मतदार यादी कुठे

बघायला मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला होता. ती आॅनलाईन करावी, अशी सूचना राजकीय पक्षांनी केली होती. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ही सूचना गांभीर्याने

घेतली.
उपायुक्त बाळासाहेब धुळाज व त्यांच चमूने परिश्रमाने हे शिवधनुष्य पेलत यादी आॅनलाईन उपलब्ध करून दिली.
विशेष म्हणजे फोटोसहित ही नावे टाकण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात फक्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयानेच नावे संकेतस्थळावर टाकली आहे. पुणे, अमरावती,

औरंगाबाद यांनी यांनी मात्र मतदारांसाठी अद्याप कोणतीही वेबसाईट तयार केली नाही. यामुळे मतदारांना फार सुविधा झाली आहे. २००९ मध्ये ही सुविधा नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: For the first time in the graduate website on the voters list