शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘विठाबाई’ नाटकाला प्रथम पारितोषिक

By admin | Updated: December 5, 2014 00:38 IST

५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रावरून अंकुर मानव समाज उत्थान केंद्र, नागपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘विठाबाई’ या नाटकाला २० हजार रुपयांचे निर्मितीचे प्रथम पारितोषिक

राज्य नाट्य स्पर्धा : ‘कमेला’ द्वितीय तर ‘घर हरविलेली माणसं’ तृतीय स्थानी
नागपूर : ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रावरून अंकुर मानव समाज उत्थान केंद्र, नागपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘विठाबाई’ या नाटकाला २० हजार रुपयांचे निर्मितीचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर केंद्रावरील निकाल आज जाहीर केला. विठाबाई या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
नागपूर केंद्रावरून १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार बोधी फाऊंडेशनने सादर केलेल्या ‘कमेला’ या नाटकाला तर तृतीय पुरस्कार महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र सांस्कृतिक मंडळाने सादर केलेल्या ‘घर हरविलेली माणसं’ या नाटकाला निर्मितीचा १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय दिग्दर्शनाचे प्रथम संजय जीवने (विठाबाई), द्वितीय श्याम मोहरील (घर हरविलेली माणसं), नेपथ्याचे प्रथम संजय काशीकर (घर हरविलेली माणसं) आणि द्वितीय मनोज वासनिक (कमेला), प्रकाशयोजनेचे प्रथम शिवशंकर माळोदे (घर हरविलेली माणसं) आणि द्वितीय मिथून मित्रा (कमेला) यांना जाहीर करण्यात आले. रंगभूषेचे प्रथम पारितोषिक बाबा खिरेकर (विठाबाई) आणि वासंती यांना ऋतुस्पर्श नाटकासाठी जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक श्रीराम जोग (डहूळ) आणि सांची जीवने यांना विठाबाई नाटकासाठी देण्यात आले. अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्र सीमा गोडबोले (क्षण एक पुरे प्रेमाचा), रेणुका चुटके (ऋतुस्पर्श), कल्याणी गोखले (चलती का नाम गाडी), केतकी कुळकर्णी (तो एक उंबरठा), श्याम मोहरील (घर हरविलेली माणसं), श्रीकांत भोगले (केस नं. ९९), विनय मोडक (आजही कैकयी) आणि अतुल सोमकुंवर यांना ‘हिटलर की आधी मौत’ या नाटकासाठी जाहीर करण्यात आली आहेत.
१७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सायंटिफिक सभागृहात जल्लोषात सादर झालेल्या या स्पर्धेत एकूण १३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रमेश कदम, सुरेश खालविलकर आणि अनिल कुळकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)