शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमार्गावरून ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST

- पाच दिवसांत रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू मुंबई : महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली ...

- पाच दिवसांत रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू

मुंबई : महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करून आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.

या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसांत एकशे दहा मे. टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळे पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल, असे केंद्र शासनाला सुचवले होते. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली आहे.

दोन दिवसांत केले प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण

- ‍ कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने दोन दिवसांत येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले आणि आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायं. ७ वा. च्या दरम्यान ऑक्सिजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आले. हे प्रत्येकी १६ मे. टन. द्रवरूप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गावर पुणेदरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरून ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा पल्ल असला तरी व्यवहार्य असा सुरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे.

पाच दिवसांत मिळणार ११० मे. टन ऑक्सिजन

- दरम्यान “या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला असून केवळ दीड दिवसात ती विशाखापट्टणम येथे पोहोचेल. तेथील ‘राष्ट्रीय इस्पात लि.’ या कंपनीतून दीड-दोन दिवसांत द्रवरूप प्राणवायू भरून टँकर लगेच पुन: महाराष्ट्राकडे रवाना होतील. अशा पद्धतीने येत्या पाच दिवसांच्या आत सुमारे ११० मे. टन ऑक्सिजन राज्याला रेल्वेवाहतुकीद्वारे राज्याला प्राप्त होईल. उच्च वजनक्षमतेमुळे ऑक्सिजन टँकरची वाहतूक रस्तामार्गे करणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हते तसेच त्यासाठी प्रदीर्घ वेळ लागला असता,” अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.