नागपूर विभागातील आग प्रतिबंधात्मक उपायांबाबत दोन दिवसात अहवाल द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 07:15 AM2021-04-23T07:15:00+5:302021-04-23T07:15:01+5:30

Nagpur news नागपूर विभागातील कोविड रुग्णालयांनी आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक एसओपी कठोरपणे पालन करावे. तसेच रुग्णालयात सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करून दोन दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी कोविड रुग्णालयांना दिले.

Fire prevention measures in Nagpur division should be reported within two days | नागपूर विभागातील आग प्रतिबंधात्मक उपायांबाबत दोन दिवसात अहवाल द्यावा

नागपूर विभागातील आग प्रतिबंधात्मक उपायांबाबत दोन दिवसात अहवाल द्यावा

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचे कोविड रुग्णालयांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नाशिक येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील कोविड रुग्णालयांनी आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक एसओपी कठोरपणे पालन करावे. तसेच रुग्णालयात सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करून दोन दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी कोविड रुग्णालयांना दिले.

कोविडच्या अतिदक्षता विभागामध्ये ज्वलनशील पदार्थाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अचानक आग लागल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी, यासाठीची तपास यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वापरण्यासाठी आयसीयु कक्षातील रुग्णसंख्येसाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचे दोन प्रतीत किमान १५ मिनिटे चालतील, असे संच भरून ठेवावेत. तसेच ते वापरण्याबाबतचे वैद्यकीय चमूला प्रशिक्षण द्यावे, अशा सूचनाही दिल्या. अग्निशमन यंत्रणा, फायर एक्सटिंग्विशर्स, हायड्रंट, स्प्रिंकलर हे अद्ययावत आणि सुस्थितीत ठेवावेत. अग्निशमनाबाबतची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची अभियंता नीलेश उकुंडे यांच्याकडून खात्री करून घ्यावी, असेही निर्देश दिले.

अशा आहेत सूचना...

- रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा किंवा प्लँट आणि वितरण व्यवस्थेतील आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना येणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात.

- वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोज मास्क २० आणि फेसशिल्ड रुग्णालयाच्या गेटवर आणि उर्वरित अतिदक्षता विभागामध्ये पुरवाव्यात.

- रुग्णालयातील सर्व इलेक्ट्रिकल फिटिंग आणि त्यांच्या जोडण्या सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी. ही जोडणी आणि फिटिंग अधिकृत विद्युत अभियंत्याकडून तपासून घ्यावी.

- रुग्णालयात अतिरिक्त वीज जोडणी देण्यापूर्वी व्हेंटिलेटर आणि इतर बाबींसंबंधी विद्युत अभियंत्याचा सल्ला घ्यावा.

- वातानुकूलित खोलीतील इलेक्ट्रिकल बोर्ड आणि बटणांपासून सर्व पडदे आणि ज्वलनशील पदार्थ दूर ठेवावेत.

- ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. या काळात पुरेशा वैद्यकीय सोयी-सुविधांनीयुक्त यंत्रणा, जसे की अतिरिक्त पाणीपुरवठा, वॉटर हीटर, मोबाईल चार्जरसाठी जोडण्यांची व्यवस्था करून ठेवावी.

- इमारतीमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा हाताळणी आणि रुग्णांना हलविण्यासंबंधी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि स्टाफला प्रशिक्षित करावे.

Web Title: Fire prevention measures in Nagpur division should be reported within two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग