आगीत घर जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST2021-04-15T04:08:27+5:302021-04-15T04:08:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बेसूर : अचानक आग लागल्याने घर जळाले. त्यात जीवनावश्यक वस्तू व साहित्य तसेच घरात ठेवलेले राेख ...

The fire burned the house | आगीत घर जळाले

आगीत घर जळाले

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेसूर : अचानक आग लागल्याने घर जळाले. त्यात जीवनावश्यक वस्तू व साहित्य तसेच घरात ठेवलेले राेख ३५ हजार रुपये जळून खाक झाले. ही घटना बेसूरनजीकच्या इंदापूर (ता. भिवापूर) येथे बुधवारी (दि. १४) सकाळी १० च्या सुमारास घडली.

इंदापूर येथील रहिवासी विनाेद मरापे यांच्या पत्नीस, घराला आग लागल्याचे आढळून आले. लागलीच तिने आरडाओरड केल्याने गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र ताेपर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू, साहित्य तसेच घरात ठेवलेले राेख ३५ हजार रुपये भस्मसात झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पं. स. सदस्य राहुल मेश्राम, सरपंच यामिनी नारनवरे, पद्माकर नारनवरे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनाच्यावतीने पंचनामा करून नुकसानग्रस्त विनाेद मरापे यांना सर्वताेपरी मदत दिली जाईल, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन राहुल मेश्राम यांनी आगपीडित कुटुंबीयांना दिले.

Web Title: The fire burned the house