शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST

नागपूर : सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीकरणासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी ...

नागपूर : सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीकरणासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी योजनेच्या अटीनुसार https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच पात्र विद्यार्थी व महाविद्यालयांनी अर्ज नोंदणी करावी. नोंदणीकरण विशिष्ट कालावधीसाठी असल्याने त्याला प्राधान्य देण्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळवले आहे.

---------------

निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याची थकबाकी मार्च महिन्यात

नागपूर : निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याची थकबाकी मार्च महिन्याच्या निवृत्तीवेतनासोबत देण्यात येईल. शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०१९ ते ३० जुन २०१९ या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम माहे जानेवारीच्या निवृत्तीवेतनासोबत द्यावयाची आहे.

पण आर्थिक वर्ष २०२०-२१ आयकरपात्र निवृत्तीवेतन धारकांच्या आयकराची परिगणना करून पुढील दोन महिन्यात कपात करावयाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोषागाराकडे आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांची संख्या जास्त आहे. त्यांच्या थकबाकी रकमेसह सर्व विवरणे नव्याने तयार करुन देणे विहीत वेळेत शक्य नाही. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याची थकबाकी मार्च महिन्याच्या निवृत्तीवेतनासोबत प्रदान करण्यात येईल. यांची सर्व ‍निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.

-------------------

माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ पर्यावरणाची शपथ

नागपूर : माझी वसुंधरा या अभियानांतर्गत स्वच्छ पर्यावरणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. बचत भवन येथे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी शपथेचे वाचन केले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आ. ना. गो. गाणार, आ. प्रवीण दटके, आ. अभिजीत वंजारी, आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. आशिष जैस्वाल, आ. विकास कुंभारे, आ. टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त शीतल तेली - उगले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.