गिट्टीखदानमध्ये गुन्हे दाखल

By Admin | Updated: May 8, 2014 18:16 IST2014-05-08T17:52:17+5:302014-05-08T18:16:00+5:30

नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सदर आणि गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले

Filing of crime in Gitankhand | गिट्टीखदानमध्ये गुन्हे दाखल

गिट्टीखदानमध्ये गुन्हे दाखल

फसवणूक : सदर, गिट्टीखदानमध्ये गुन्हे दाखल
नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध सदर आणि गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
बाबू महादेव गोरले (वय ५२, रा. गुमथळा) याची मौजा चक्की खापा येथे शेतजमीन आहे. तिच्या विक्रीचा दस्तावेज गोरलेने शकील बाबू शेख छोटू साहाब (वय ४१, रा. सादिकाबाद) याच्या नावाने तयार केेला. विक्रीसाठी कागदपत्रे सादर करताना आरोपीने वर्ग २ ऐवजी वर्ग १ चा सातबारा देऊन दुय्यम निबंधक कार्यालयात विक्रीपत्र तयार करून घेतले. ही बाब उघड झाल्यानंतर सहदुय्यम निबंधक विकास गुलाबराव बहिरमवार (वय ५६) यांनी सदर पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शकिलला अटक केली. गोरलेचा शोध घेतला जात आहे.
अशाच प्रकारे मौजा बोरगाव येथील आरोपी मोहम्मद जहिन खान मोहम्मद मतिन खान याने सोमलवाडा येथील भूखंड आपल्या मालकीचा असल्याची बतावणी करून अजय हरिश्चंद्र चहांदे (वय ४२, रा. उंटखाना) यांच्याकडून २६ लाख ३२ हजार रुपये घेतले. २४ मे २०१२ ते ७ मे २०१४ या कालावधीत हा व्यवहार झाला. विक्री करण्यासाठी गेलेल्या चहांदेना हा भूखंड जहिन खानचे नसल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली आरोपी जहिन खान विरुद्ध गुन्हे दाखल केले. त्याचा शोध घेतला जात आहे.
------

Web Title: Filing of crime in Gitankhand