शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात थेट विक्रीच्या आदेशाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:17 IST

महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देविक्रीचा अनुभवच नाही : येईल तो भाव दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. या संदर्भात त्यांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शनही मिळाले नाही. त्यामुळे ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.सकाळच्या सुमारास फुले मार्केट, कॉटन मार्केटमधील भाजीबाजार एका तासासाठी सुरू ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो बंद करण्यात आला. ताजी भाजी न मिळाल्याने या परिसरातील नागरिक नाराज झाले. दुसरीकडे कळमना बाजार सुरू होता. मात्र ग्राहकच नसल्याने तो बंद करावा लागला. महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग केला असला तरी, तो अयशस्वी ठरला. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात आणलेली भाजी परत नेऊनही खराबच होणार असल्याने ग्राहक मागतील त्या भावाने अनेक शेतकऱ्यांना विक्री करावी लागली.महात्मा फुले भाजी बाजार अडते (दलाल) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांच्या मते, शहरातील विविध भागांमध्ये भाजीबाजार सुरू केल्याने जुना बाजार बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. ही व्यवस्था सुरू करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या मेहनतीचे योग्य दाम मिळावे यासाठी शेतकऱ्यांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी होती. शहरातील सर्व मुख्य भाजीबाजार, उपबाजारसुद्धा सुरू ठेवले तर नागरिकांना ताजा भाजीपाला योग्य दरात मिळू शकेल. वाढणारी गर्दीही नियंत्रित करता येऊ शकेल. त्यामुळे शहरातील सर्व भाजी बाजार सुरू करावेत, अश्ी मागणी महात्मा फुले भाजी बाजार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना दिवसभर विक्रीची सवय नाहीराम महाजन म्हणाले, शेतकरी शेतातील भाजीपाला दलालांना विकतात, दलाल दिवसभर बसून चिल्लर विक्रेत्यांना विकतात तसेच दिवसभर विक्री करतात. शेतकऱ्यांना ही सवय नाही. त्यांच्याकडे यासाठी वेळही नाही. यामुळेच शेतकऱ्यांना बराच त्रास सहन क रावा लागला.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी