शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो ‘अर्ज करा कर्ज घ्या’

By admin | Updated: June 6, 2015 02:16 IST

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. परंतु यंदा हा त्रास होणार नाही. कारण खुद्द

नागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. परंतु यंदा हा त्रास होणार नाही. कारण खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून तालुकास्तरावर कर्ज सुविधा समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये कर्ज वितरणाशी संबधित सर्व घटक एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ‘अर्ज करा आणि कर्ज घ्या’, अशी सुविधा शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वत: या योजनेविषयी शुक्रवारी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: खरीप आढावा बैठक घेतली होती. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज सुलभपणे मिळावे, असे निर्देश दिले होते. आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता पडेल. शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर कर्ज सुविधा समिती स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष राहतील. तर तालुका कृषी अधिकारी, ब्लॉक लेवल बँकर्स कमिटीचे समन्वयक, सहायक निबंधक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निरीक्षक आणि राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी हे सदस्य राहतील. दर आठवड्यात सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात या समितीची तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात बैठक होईल. या बैठकीत ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असेल त्यांनी अर्ज करावा. कर्ज वितरणाशी संबंधित सर्व घटक या समितीमध्ये असल्याने त्यांच्या अर्जावर लगेच निर्णय घेऊन त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले की, शासनाने ८४० कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते आम्ही पूर्ण करूच परंतु कुठलाच गरजू शेतकरी कर्जापाून वंचित राहू नये. नवीन शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कर्ज सुविधा समिती स्थापन केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)गेल्यावर्षीच्या थकीत कर्जदारांना विशेष सवलत ४गेल्यावर्षीची नैसर्गिक आपत्ती आणि पीक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने गेल्यावर्षी कर्ज घेणारे परंतु काही कारणास्तव कर्ज चुकते न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच विशेष सवलत दिली आहे. या विशेष सवलती अंतर्गत गेल्यावर्षी कर्ज घेणारे थकीत कर्जदार शेतकरी सुद्धा यंदा कर्ज घेऊ शकतील. त्यांना थकीत कर्जाची रक्कम ही पाच वर्षात टप्प्याटप्प्याने फेडता येईल. परंतु ही सवलत केवळ गेल्यावर्षीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठीच आहे. अनेक वर्षांपासून कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ही सवलत मिळणार नाही, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.