शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाची धग नागपुरातही

By admin | Updated: June 3, 2017 01:41 IST

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : भाजीपाला फेकला, दूध ओतले, राम नेवले, अरुण केदार, नंदा परातेंसह अनेक कार्यकर्ते ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेत आपला भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवित आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत भाजीपाला व दूध रस्त्यावर टाकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधी नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. यानंतर राम नेवले यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होत असल्याच्या घटनेचा निषेध नोंदवित हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनात राम नेवले, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. अन् पोलिसांची उडाली तारांबळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पोलिसांनी चांगलीच धसकी घेतली आहे. नागपुरात या आंदोलनाची फार तीव्रता नसली तरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे मुख्य गेट बंद करण्यात आले होते. दुपारी २ वाजता कार्यकर्ते एकत्र आले. निदर्शने सुरू असतानाच एक कार्यकर्ता भिंतीवरून उडी घेऊन दुधाच्या कॅनसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पळत सुटला, पोलीसही त्याच्या मागे धावले व त्याला पकडले. पोलिसांनी पकडल्यावरही त्याने कॅनमधील दूध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतले आणि शासनाचा निषेध व्यक्त केला. भाजीपाला उचलून पोलिसांनीच केला रस्ता स्वच्छ आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर भाजीपाला, कांदे, मिरची, कोबी आदी टाकून आपला निषेध व्यक्त केला. आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आपल्यासोबत नेले. त्यानंतर भाजीपाला तसाच रस्त्यावर पडून होता. तेव्हा बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीच पोत्यामध्ये हा कचरा भरला व रस्ता स्वच्छ केला. आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या पाठिशी भारतातील शेती आणि शेतकरी सरकारी धोरणांमुळे गंभीर संकटात आले आहेत. गेली अनेक वर्षे त्यावर नुसतीच चर्चा होत आहे. कर्जमाफी हा जरी कायमस्वरूपी उपाय नसला तरी आत्यहत्या त्वरित थांबवायच्या असतील तर कर्जमाफी शिवाय पर्याय नाही, हे सरकारने समजून घ्यावे, असे आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी स्पष्ट करीत शेतकऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. आजची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढावा. जर सरकार सकारात्मक दिसत नसेल तर कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेतमालाला भाव देण्यासाठी ठराव आणून सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पार्टीने एकत्रित येऊन ठराव पारित करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.