शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी नंबर प्लेट, केंद्र शासन प्रतिवादी

By admin | Updated: February 18, 2015 02:33 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फॅन्सी नंबर प्लेटविरुद्धच्या फौजदारी रिट याचिकेत केंद्र शासनास प्रतिवादी करण्याची मुभा दिली.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फॅन्सी नंबर प्लेटविरुद्धच्या फौजदारी रिट याचिकेत केंद्र शासनास प्रतिवादी करण्याची मुभा दिली. तसेच, केंद्र शासनाला नोटीस बजावून फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांवरील दंडात वाढ करण्यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून दंड वाढविण्याची जबाबदारी केंद्र शासनाची असल्याचे सांगितले आहे. मोटर वाहन कायदा-१९८८ व केंद्रीय मोटर वाहन नियम-१९८९ केंद्र शासनाच्या अधिकारक्षेत्रात आहे. फॅन्सी नंबर प्लेटमुळे नियम-१९८९ मधील तरतुदींचे (नियम-५०) उल्लंघन होते. नियम-१९८९ मध्ये नंबर प्लेटच्या निकषांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंड आकारण्याची तरतूद नाही. यामुळे कायदा-१९८८ मधील कलम १७७ अंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी १०० रुपये तर, दुसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी ३०० रुपये दंड आकारण्यात येतो. केंद्र शासनाने कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून ‘रस्ते परिवहन व सुरक्षा विधेयक-२०१४’ जाहीर केले आहे. त्यावर नागरिकांचे आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या आहेत. यात विविध गुन्ह्यांसाठी दंड वाढविण्याचे प्रस्तावित आहे. दंड वाढविण्यासंदर्भात राज्य शासन धोरण निश्चित करू शकत नाही अशी माहिती राज्य शासनाने दिली आहे. यामुळे प्रकरणात केंद्र शासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. सत्पालसिंग रसपालसिंग रेणू यांनी ही याचिका दाखल केली आहे.(प्रतिनिधी)