शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट, ११ कामगार होरपळले, तिघांचा मध्यरात्रीनंतरही शोध नाही

By जितेंद्र ढवळे | Updated: April 12, 2025 05:14 IST

Nagpur News: उमरेडमधील एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

- शरद मिरेउमरेड -उमरेडमधील एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू आहेत. यासोबत तीन कामगारांचा मध्यरात्रीनंतरही शोध लागलेला नाही. यास उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांनी दुजोरा दिला. मध्यरात्री १ वाजतानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सायंकाळी ६ वाजता कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. रात्री उशिरा सर्वच जखमी कामगारांना नागपूर येथे आणण्यात आले.

उमरेड एमआयडीसीत एमएमपी ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या कंपनीत जोराचा स्फोट झाला.कच्च्या ॲल्युमिनियम पावडरचा उपयोग करून ॲल्युमिनियम फाॅइलला पॉलिश करण्याचे काम ज्या मशीनमध्ये केले जाते, ती मशीन हाताळत असताना, कंपनीत अचानक स्फोट झाला.

घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, उमरेडचे ठाणेदार धनाजी जळक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी अग्निशमन दलासह रुग्णवाहिकांना पाचारण करून स्फोटातील जखमी कामगारांना बाहेर काढत उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये रवाना केले. दरम्यान, नागपूर महापालिकेच्या लकडगंज आणि सक्करदरा झोनमधील दोन अग्निशमन वाहने आणि सात जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले. आ. संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे यांनी घटनास्थळी भेट देत कामगारांशी संवाद साधला.

१५० कामगार बचावलेया कंपनीत एकूण ४५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान, कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले.

कंपनीत चार युनिटया कंपनीत चार युनिट आहेत. स्फोट ज्या ठिकाणी झाला तिथे २२ कामगार कर्तव्यावर होते, अशी माहिती आहे. विनोद खंडेलवाल या कंपनीचे संचालक तर ललित भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

अशी आहेत जखमींची नावे : पीयूष बाबाराव टेकाम (२१, रा. पांजरेपार), पीयूष वासुदेव दुर्गे (२०, रा. पांजरेपार), मनीष अमरनाथ वाघ (२०, रा. पेंढराबोडी), करण भास्कर बावणे (२१, पेंढराबोडी), करण तुकाराम शेंडे (२०, रा. गोंडबोरी), कमलेश सुरेश ठाकरे (३०, रा. गोंडबोरी), सचिन पुरुषोत्तम मसराम (२६, रा. पांजेरपार), नवनीत कुंभारे (२७, रा. पांजरेपार) अशी जखमींची नावे आहेेत. हे सर्व कामगार भिवापूर तालुक्यातील राहणारे आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोट