शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

थकीत टॅक्स वसुली मोहीम : मनपा २७ मालमत्ताचा लिलाव करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 23:15 IST

NMC Exhausted tax recovery drive वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकीत असणाऱ्या स्थावर मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. यात जप्त करण्यात आलेल्या २७ मालमत्तांचा ९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्यापूर्वी मालमत्ताधारकाना थकबाकी भरण्याची शेवटची संधी उपलब्ध आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारांना टॅक्स भरण्याची शेवटची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकीत असणाऱ्या स्थावर मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. यात जप्त करण्यात आलेल्या २७ मालमत्तांचा ९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्यापूर्वी मालमत्ताधारकाना थकबाकी भरण्याची शेवटची संधी उपलब्ध आहे.

थकबाकीदारांच्या ६४ मालमत्ता जप्त केल्या होत्या. यातील काही मालमत्ताचा काही दिवसापूर्वी लिलाव करण्यात आला. यातील शिल्लक मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.

मनपाचा आर्थिक स्रोत मालमत्ता कर आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी वाढली आहे. अनेक. मालमत्ताधारक कर भरत नसल्याने मनपाने लिलाव मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांला आधी दोनदा नोटीस दिल्यावरही कर जमा न केल्यास संबंधित मालमत्तावर जप्ती कारवाई करण्यात येते. त्यानंतर जप्त केलेल्या या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. गेल्या महिन्यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रतापनगर परिसरातलील एका डुप्लेक्स बंगल्याचा ५७ लाखांत लिलाव करण्यात आला. या मालमत्तेवर ६४ हजारांची अनेक वर्षांपासूनची थकबाकी होती. नोटीस पाठविल्यावरही मालमत्ताधारकाने प्रतिसाद दिला नाही. तसेच हनुमाननगर झोनमध्ये मालमत्ताधारकाने मालत्तेचे म्युटेशन न केल्याने मालत्ताप्रकरणी जुन्या ले-आऊट धारकास नोटीस पाठविली गेली. ती नाकारण्यात आल्यानंतर मनपातर्फे मालमतेबाबत सूचना प्रसिद्ध केली. मात्र, त्यानंतरही कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्या मालमत्तेचाही लिलाव करण्यात आला. आता या मालमत्ताधारकाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु मनपाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर लिलाव प्रक्रिया केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर