जरीपटक्यातील तरुणीची गुजरातमध्ये विक्री

By Admin | Updated: June 14, 2014 03:00 IST2014-06-14T03:00:09+5:302014-06-14T03:00:09+5:30

जरीपटक्यातील तरुणीची गुजरातमध्ये विक्री करणाऱ्या तीन महिलांना तसेच पैसे देऊन तिच्याशी ...

Even the girl in the street selling in Gujarat | जरीपटक्यातील तरुणीची गुजरातमध्ये विक्री

जरीपटक्यातील तरुणीची गुजरातमध्ये विक्री

नागपूर : जरीपटक्यातील तरुणीची गुजरातमध्ये विक्री करणाऱ्या तीन महिलांना तसेच पैसे देऊन तिच्याशी लग्न लावणाऱ्या एका व्यापाऱ्याला जरीपटका पोलिसांनी अटक

केली.
नेहा (वय २२, नाव काल्पनिक) हिचे आईवडिलांशी पटत नसल्याने ती काही दिवसांपूर्वी मामांकडे राहायला आली. मात्र, तेथेही तिचे पटले नाही. त्यामुळे मामाच्या घरून

निघून ती धुणीभांड्याचे काम करू लागली. दरम्यान, ती लक्ष्मीबाई वाकडे (वय ४२, रा. लुम्बिनीनगर), सुनीता करिहार (वय ४५, रा. मार्टिननगर) आणि वंदना खान

(रा. राजीवनगर) या तिघींच्या संपर्कात आली. नेहाने आपली परिस्थिती सांगितल्यानंतर या तिघींनी तिला ‘तुझे चांगल्या घरात लग्न लावून देतो’, अशी बतावणी करून १०

एप्रिलला राजकोट (गुजरात) येथे नेले. तेथील परेश राठोड (वय ३५) या व्यापाऱ्यासोबत नेहाचे लग्न लावून दिले.
यावेळी वाकडे नामक महिलेने नेहा आपलीच मुलगी असल्याचे परेशला सांगितले. लग्नानंतर त्याच्याकडून ३५ हजार रुपये घेऊन या तिघीही परत आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Even the girl in the street selling in Gujarat