शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांकडे १ अब्ज १४ कोटींची थकबाकी

By admin | Updated: May 25, 2014 00:49 IST

वीज वितरण कंपनी सध्या खासगी वीज निर्मिती कंपन्यासोबत स्पर्धा करताना कंपनीतील थकबाकीतून कसा मार्ग काढायचा, या विवंचनेत गुंतली आहे. अशातच वीज वितरण कंपनीची नागपूर ग्रामीण

पाच जिल्हे : वसुलीचे आव्हान

प्रवीण खिरटकर - वरोरा

वीज वितरण कंपनी सध्या खासगी वीज निर्मिती कंपन्यासोबत स्पर्धा करताना कंपनीतील थकबाकीतून कसा मार्ग काढायचा, या विवंचनेत गुंतली आहे. अशातच वीज वितरण कंपनीची नागपूर ग्रामीण भागातील पाच जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ५७५ ग्राहकांकडे तब्बल १ अब्ज १४ कोटी ९ लाख ६५ हजार १२५ रुपयांची कायमस्वरूपी थकबाकी आहे. ही थकबाकी कायम स्वरूपी असल्याने ते वसूल करण्याचे आव्हान वीज वितरण कंपनी पुढे उभे ठाकले आहे.

विद्युत गळती, वीज चोरी, यावर वीज वितरण कंपनीने विविध प्रकारचे पथके तयार करून बर्‍याच प्रमाणात आळा बसविला आहे. अनेक भागातील भारनियमनही बंद करण्यास वीज वितरण कंपनीला यश आल्याचे दिसून येत आहे. असे असताना ग्राहकांकडे असलेली थकबाकी काढण्याचे आव्हान वीज वितरण कंपनीसमोर आहे. नागपूर ग्रामीण भागातील पाच जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे कायमस्वरूपी थकीतदार दिवसागणीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात ३९,७९७ ग्राहकाकडे १३ कोटी ७५ लाख ९२ हजार 0५३ रु., चंद्रपूर जिल्ह्यात ५१,९0६ ग्राहकाकडे २३ कोटी ११ लाख ५९ हजार ६६ रु., गडचिरोली जिल्ह्यात ४४,३५0 ग्राहकांकडे १५ कोटी ४१ लाख ३४ हजार २५२ रुपये, गोंदिया जिल्ह्यात ५४,८६४ ग्राहकांकडे ३१ कोटी १८ लाख ७९ हजार २४७, वर्धा जिल्ह्यात ५५,६५८ ग्राहकांकडे ३0 कोटी ६२ हजार ५0७ रुपये अशी एकूण एक अब्ज १४ कोटी नऊ लाख ६५ हजार रुपयांची कायमस्वरूपी थकबाकी आहे. यातील काही ग्राहकांना कंपनीने थकबाकी वसूल करण्याविषयी नोटीसही बजावल्या आहेत. तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. कायमस्वरूपी थकबाकी असणार्‍या ग्राहकांना थकबाकी अदा केल्याशिवाय नवीन कनेक्शन मिळणार नाही, असा वीज वितरण कंपनीचा नियम आहे.

वीज वितरण कंपनी ग्राहकांना सणासुदीच्या दिवसात वीज मिळावी म्हणून बाजारपेठेतून महागडी वीज घेऊन ग्राहकांना वीज पुरवठा करते. याकरिता वेगळे शुल्क आकारत नाही. यासोबतच कृषी पंप बिपीएलधारकांना सवलतीच्या दरात वीज दिली जाते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीज बिल थकित असल्याने कंपनीचे दिवाळे निघत आहे. (तालुका प्रतिनिधी)