आठ जिल्हा न्यायाधीशांची नागपुरात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:07 IST2021-03-22T04:07:43+5:302021-03-22T04:07:43+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांसंदर्भात सुधारित आदेश जारी केला असून, त्यानुसार आठ जिल्हा न्यायाधीशांची ...

Eight district judges transferred to Nagpur | आठ जिल्हा न्यायाधीशांची नागपुरात बदली

आठ जिल्हा न्यायाधीशांची नागपुरात बदली

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांसंदर्भात सुधारित आदेश जारी केला असून, त्यानुसार आठ जिल्हा न्यायाधीशांची नागपुरात, तर तीन जिल्हा न्यायाधीशांची नागपुरातून इतर शहरांत बदली करण्यात आली आहे. यापूर्वीचा आदेश गेल्या २४ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता.

सुधारित आदेशाद्वारे औरंगाबाद येथील ए. डी. साळुंखे, नाशिक येथील पी. बी. घुगे, मुंबई येथील आर. एस. पावसकर, बी. पी. व्यास, पुसद (यवतमाळ) येथील एस. बी. गावंडे, बुलडाणा येथील ए. ए. ढुमणे, भंडारा येथील ए. सी. राऊत व इस्लामपूर (सांगली) येथील एस. सी. मुनघाटे यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच, नागपूर येथील डी. ए. जाधव यांची अमरावतीला, डी. वाय. काळे यांची जळगावला, तर व्ही. बी. कुलकर्णी यांची पुसद (यवतमाळ) येथे बदली करण्यात आली आहे. तसेच पी. एम. बदर व ए. एस. काझी यांना पुढील एक वर्षाकरिता नागपूरमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.

Web Title: Eight district judges transferred to Nagpur