शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
4
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
5
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
6
मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
7
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
8
घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
9
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
10
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
11
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
12
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
13
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
14
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
15
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
16
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
17
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
18
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
19
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
20
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
Daily Top 2Weekly Top 5

ड्युप्लेक्समध्ये देहव्यापाराचा अड्डा

By admin | Updated: May 22, 2014 18:30 IST

गुन्हेशाखा पोलिसांनी कळमना मार्गावरील एच.बी. नगर येथील एका ‘ड्युप्लेक्स’मध्ये धाड टाकून येथे सुरू असलेल्या देह व्यापार्‍याचा अड्डा उघडकीस आणला.

नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी कळमना मार्गावरील एच.बी. नगर येथील एका ‘ड्युप्लेक्स’मध्ये धाड टाकून येथे सुरू असलेल्या देह व्यापार्‍याचा अड्डा उघडकीस आणला. या अड्डय़ाची प्रमुख सूत्रधार सीमा मिश्रा हिला पोलिसांनी अटक केली असून दोन तरुणींना मुक्त करण्यात आले.

सीमा ही एच.बी.नगर येथील एक ड्युप्लेक्स भाड्याने घेऊन राहते. तिचा पती खासगी बँकेत कलेक्शन एजंट म्हणून काम करतो. गुन्हेशाखेच्या सामाजिक विभागाला सीमाद्वारा देहव्यापार चालविला जात असल्याची माहिती मिळाली. मागील एक आठवड्यापासून पोलिसांची तिच्यावर नजर होती. बुधवारी दुपारी सीमाकडे एक बोगस ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने दोन तरुणींची मागणी केली. सौदा पक्का होताच दडून असलेल्या पोलिसांनी धाड मारून सीमाला पकडले. सूत्रांनुसार सीमा गेल्या एक वर्षांंपासून देहव्यापार करीत आहे. ग्राहक आल्यावर ती तरुणीला बोलावित असे.

साधारणपणे प्रत्येक ग्राहकाकडून दोन हजार रुपयांची मागणी केली जात होती. यापैकी हजार रुपये जागा उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात घेतले जात होते. तिच्या अड्डय़ावरून मिळालेली एक मुलगी घटस्फोटित असून दुसरी बेरोजगार आहे.

ही कारवाई उपायुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव गिरी, बी.एम. पवार, सहायक निरीक्षक बारापात्रे, पाटील, उपनिरीक्षक कोहळे, मदने, हवालदार पांडुरंग निकुरे, प्रकाश सिडाम, संजय तेलमासरे आदींनी केली. (प्रतिनिधी)