शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला पुन्हा आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:04 IST

भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला मागील आठवडाभरापासून लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गेल्या गुरुवारी २२ मे रोजी रात्री उशिरा येथे आग लागली होती. या घटनेपासून अग्निशामक दलाची दोन वाहने यार्ड परिसरात तैनात आहेत. कचºयातून धूर निघताच जवान पाण्याचा शिडकावा करतात. काही वेळ आग विझल्यावर पुन्हा धूर निघणे सुरू होते. आठवडाभरापासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांसह हे पथकही त्रस्त झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला मागील आठवडाभरापासून लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गेल्या गुरुवारी २२ मे रोजी रात्री उशिरा येथे आग लागली होती. या घटनेपासून अग्निशामक दलाची दोन वाहने यार्ड परिसरात तैनात आहेत. कचºयातून धूर निघताच जवान पाण्याचा शिडकावा करतात. काही वेळ आग विझल्यावर पुन्हा धूर निघणे सुरू होते. आठवडाभरापासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांसह हे पथकही त्रस्त झाले आहे.गेल्या आठवड्यातील आगीनंतर पुन्हा २८ मे रोजी दुसऱ्यांदा सकाळी ११.३० वाजता कचºयातून आगीच्या ज्वाळा उठल्या. आग पसरताच डम्पिंग यार्डच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. या घटनेपासृून यार्डमध्ये चार वाहने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राबत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या घटना वाढतात. त्यानंतर धूर पसरायला लागला की परिसरात असणाºया वस्त्यांमधील नागरिक त्रस्त होतात.हॉटेल,दाल मिल, डेकोरेशन गोदामही जळालेइतवारीमधील शहीद चौकत असलेलेवंदना साऊथ इंडियन हॉटेलला बुधवारी रात्री ११ वाजता शार्ट सर्किटमुळे आग लागली. यात फ्रिज, ओव्हन, वॉटर फिल्टर, ग्राईंडर मशीन व किचनमधील अन्य साहित्य जळाले. या घटनेमध्ये ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी ११ वाजता कळमना येथील भारतनगर परिसरात असलेल्या दाल मिलला आग लागली. तर दुपारी स्वावलंबीनगरच्याप्लॉट नं. २८४ वरील डेकोरेशन गोदामालाही आग लागली. यात तिरपाल, कपडे व अन्य सामान जळाल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर