शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ड्रग सप्लायर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात गुंड आणि ड्रग तस्कर अंकिश ऊर्फ गुलाम तुर्केल याच्यासाठी काम करणाऱ्या दोन ड्रग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुख्यात गुंड आणि ड्रग तस्कर अंकिश ऊर्फ गुलाम तुर्केल याच्यासाठी काम करणाऱ्या दोन ड्रग सप्लायर्सना गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांची एमडी तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. बैद्यनाथ चाैकातील बसस्थानकाजवळ बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

साैरभ दादाराव छपाने (वय २२, रा. धम्मनगर, काटोल मार्ग, नागपूर) आणि संदीप मुचुकुंद पांडे (वय २१, रा. चिंतामणीनगर दुर्गा माता मंदिराजवळ भिवसनखोरी) अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग सप्लायर्सची नावे आहेत.

पोलिसांच्या रेकाॅर्डवरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंकिश तुर्केल हा गेल्या काही महिन्यांपासून एमडी तस्करीत चांगलाच सक्रिय झाला आहे. विज्ञान शाखेचा पदवीधर असलेला साैरभ आधी नागपुरात हुक्का पार्लर चालवायचा. येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एमडी पुरविताना त्यालाही एमडीची लत लागली. पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाई केल्याने तो येथून पुण्याला पळून गेला आणि तेथे तो फोन पे कंपनीत काम करू लागला. मात्र, एमडीचे व्यसन भागविण्यासाठी पुरेशी रक्कम मिळत नसल्याने तो अस्वस्थ होता. अशात त्याला मुंबईच्या मंगेशची आणि तुर्केलसाठी ड्रग तस्करी करणाऱ्या संदीप पांडेची साथ मिळाली. तेव्हापासून साैरभ आणि संदीप मंगेशकडून मुंबईहून नियमित एमडीची खेप आणत होते. बुधवारी ते अशाच प्रकारे ५३.४८ ग्राम एमडी घेऊन नागपुरात आले. बैद्यनाथ चाैकातील ट्रॅव्हल्सच्या स्थानकापासून ते होंडा शाईन दुचाकीने एमडीची खेप पोहोचविण्यासाठी निघाले. मात्र, आधीच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या एनडीपीएसच्या पथकाने त्यांना पकडले. साैरभ आणि संदीपची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच लाख, ३४ हजार रुपये किमतीची एमडी सापडली. ती तसेच मोटरसायकल आणि मोबाइल असा एकूण सहा लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. प्राथमिक चौकशीत त्यांनी ही खेप गुलाम तुर्केल (रा. फ्रेण्ड‌्स कॉलनी) याच्यासाठी आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

---

सूत्रधार तुर्केल आलाच नाही

तुर्केल बहुचर्चित आशी मिळून हा गोरखंदा करतात. साैरभ आणि संदीप बैद्यनाथ चौकातच तुर्केलला एमडीची डिलिव्हरी देणार होते.

मात्र, तुर्केलला शंका आली काय, कळायला मार्ग नाही. दुपारपासून सायंकाळपर्यंत वाट बघूनही तुर्केल तेथे आलाच नाही. त्यात हे दोघेही दुचाकीने निघून जाताना दिसल्याने अखेर पोलिसांनी त्यांना पकडले. तुर्केल फरार झाला. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त भीमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सार्थक नेहते, सहायक निरीक्षक सूरज सुरोशे, हवलदार नामदेव टेकाम, समाधान गिते, नायक विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, कपिलकुमार तांडेकर, राहुल गुमगावकर, अश्विन मांगे, समीर शेख, नितीन साळुंखे आणि राहुल पाटील यांनी ही कामगिरी बजावली.

---