शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आठव्याची स्वप्ने अजून सातव्या वेतन आयोगाचाच लाभ नाही ! महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:36 IST

Nagpur : महाराष्ट्रातील कृषी विकासाचा कणा असलेले चारही कृषी विद्यापीठे आणि 'माफसू'मधील अध्यापक सध्या एका विचित्र प्रशासकीय कात्रीत अडकले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील कृषी विकासाचा कणा असलेले चारही कृषी विद्यापीठे आणि 'माफसू'मधील अध्यापक सध्या एका विचित्र प्रशासकीय कात्रीत अडकले आहेत. संपूर्ण देशात ८ व्या वेतन आयोगाचे वारे वाहू लागले आहेत, नवीन वेतन रचनेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत; मात्र राज्यातील कृषी अध्यापकांसाठी हा 'भरवशाच्या म्हशी'सारखा प्रकार ठरला आहे. कारण, ज्या ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होऊन दशक उलटले, त्याचे पूर्ण लाभ आजही या अध्यापकांच्या पदरात पडलेले नाहीत. केंद्र सरकारने आपला वाटा रोखून धरल्यामुळे संशोधकांच्या नशिबी केवळ 'टोणगा' आल्याची भावना व्यक्त होत आहे.

इतर सर्व शासकीय विभागांनी ७व्या आयोगाची फळे चाखली, पण कृषी अध्यापकांना केंद्र आणि राज्याच्या '५०:५०' निधी वाटपाच्या वादात अडकवून ठेवण्यात आले. राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकली नाही, पण केंद्राकडून येणारा हजारो कोटींचा निधी का रखडला, याचे उत्तर देण्यास कुणीही तयार नाही. विशेष म्हणजे, विद्यापीठांचे कुलगुरू या अन्यायाविरुद्ध ब्र काढायलाही तयार नाहीत. प्रशासकीय अनास्थेमुळे आज निवृत्त प्राध्यापक उपचारांसाठी पैशांची वाट पाहत आहेत, तर कार्यरत प्राध्यापक तिप्पट कामाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. 

इतर राज्यांत सुकाळ, मग महाराष्ट्रातच दुष्काळ का?

उत्तर प्रदेश, हरयाणा आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांनी केंद्राशी प्रभावी समन्वय साधून आपल्या कृषी अध्यापकांचे ७ व्या वेतन आयोगाचे प्रश्न केव्हाच मार्गी लावले आहेत. हरयाणा सरकारने तर केंद्राच्या निधीची वाट न पाहता अध्यापकांना लाभ दिले आणि नंतर केंद्राकडून त्याची प्रतिपूर्ती करून घेतली. उत्तर प्रदेशातही केंद्र सरकारने थकीत अनुदानाचा हिस्सा वेळेत मुक्त केल्याने तिथे कोणताही पेच उरला नाही. मात्र, महाराष्ट्रात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि विद्यापीठ प्रशासनाचा सुस्त पाठपुरावा यामुळे १० वर्षापासून ५० टक्के थकबाकी प्रलंबित आहे.

तिप्पट कामाचा ताण आणि रिक्त पदांचे ग्रहण

कृषी विद्यापीठांमध्ये गेल्या दशकापासून नवीन पदभरती न झाल्याने कार्यरत प्राध्यापकांवर कामाचा अभूतपूर्व ताण आहे. एकाच वेळी वर्गातील अध्यापन, प्रयोगशाळेतील संशोधन आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विस्तार शिक्षण देण्याचे काम त्यांना करावे लागत आहे.

"जर कृषी शिक्षण देणारा अध्यापकच आर्थिक विवंचनेत असेल, तर राज्याचे कृषी संशोधन कसे टिकणार? केंद्र सरकारने ७ व्या आयोगाची थकबाकी तातडीने देऊन हा अन्याय दूर करावा, अन्यथा कृषी शिक्षण व्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही."-अध्यापक संघटना प्रतिनिधी

English
हिंदी सारांश
Web Title : Agricultural Universities' Plight: Eighth Pay Dreams, Seventh Pay Still Pending!

Web Summary : Maharashtra's agricultural university professors face financial hardship. Seventh Pay Commission benefits remain incomplete despite national discussions of the Eighth. The central government's delayed funding leaves researchers struggling, burdening faculty with excessive workloads. Other states resolved this, but Maharashtra lags due to administrative apathy.
टॅग्स :nagpurनागपूर