शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करण्याचे नागपूर पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 18:16 IST

देशासह नागपुरातील कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी देशहिताच्या दृष्टीने यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करा, आणि देशहितासाठी गर्दी टाळा, असे आवाहन गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशासह नागपुरातील कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी देशहिताच्या दृष्टीने यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करा, आणि देशहितासाठी गर्दी टाळा, असे आवाहन गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी केले.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीयर्स (बानाई), असोसिएशन फॉर सोशल अ‍ॅन्ड इकॉनॉमिक ईक्वलिटी, समता सैनिक दल, आवाज इंडिया टी.व्ही., महाराष्ट्र ऑफीसर्स फोरम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तसेच शांतीवन, विचोली येथील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी झाली. यात हे आवाहन केले.दरवर्षी १४ एप्रिलला प्रामुख्याने दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, नागलोक, निलोली, बुद्धवन तसेत शहरातील बौद्ध विहारांच्या ठिकाणी मिरवणुकीसह कार्यक्रम व उपक्रम होतात. यंदा असे कार्यक्रम न घेता महामानवास घरुनच अभिवादन करावे व पुष्पहार अर्पण करावा. कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमास परवानगी नाहीसध्या राज्यात कलम १४४ लागू असून पोलीस विभागाकडून १३ व १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोणत्याही कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार असल्याने बौद्ध बांधवांनी पोलिसांना सहकार्य करावे. यासाठी भंतेजींनी स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मदतीने परिसरातील बांधवांना मार्गदर्शन करावे, असे सांगण्यात आले.दीक्षाभूमी परिसर करणार सील१३ व १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमी व सभोवतालचा परिसर बंद ठेवला जाणार आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीने ही जबाबदारी घेतली आहे. दीक्षाभूमीभवताच्या माता कचेरी चौक, लक्ष्मीनगर चौक, काचीपुरा चौक व बजाजनगर या चारही चौकात पोलीस बंदोबस्त लावून परिसर सील करण्यात येणार आहे. दीक्षाभूमीचे मागील प्रवेशद्वारही बंद ठेवले जाणार आहे.पदाधिकाऱ्यांचेही आवाहनदीक्षाभूमी स्मारक समितीसह सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनीही यंदा घरातून महामानवाला अभिवादन करावे व आदरांजली वाहावी, असे आवाहन केले आहे. कोरोनासाठी प्रशासनाने घेतलेली दक्षता सर्व समाजहिताची असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच, चित्रकला, भिमगीत, निबंध असे उपक्रम राबवून आवाज इंडियाकडे पाठविण्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती