डॉ. आंबेडकर रुग्णालय विकासाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: May 18, 2016 03:14 IST2016-05-18T03:14:27+5:302016-05-18T03:14:27+5:30

कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे.

Dr. Ambedkar Hospital waiting for development | डॉ. आंबेडकर रुग्णालय विकासाच्या प्रतीक्षेत

डॉ. आंबेडकर रुग्णालय विकासाच्या प्रतीक्षेत

रुग्णसंख्याही घसरली : दहा वर्षांपासून केवळ बाह्यरुग्ण विभाग
नागपूर : कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे. मात्र, प्रत्यक्षात १० वर्षे होऊनही हे रुग्णालय केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाची रुग्णसंख्या दरवर्षी कमी होऊन सध्या ती ४०० वर आली आहे.
या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर निर्णय ३ मार्च २०१४ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर करण्यात आला. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार होता. ५६८ खाटांचे हे रुग्णालय होणार होते. रु ग्णालयाकडे सध्या २९ हजार ७९ चौरस मीटरची जागा उपलब्ध आहे. यातील काही जागेवर बांधकाम होणार होते. डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी १०७३ पदे भरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात प्राध्यापकांची २१, सहयोगी प्राध्यापकांची २३, सहाय्यक प्राध्यापकांची ३६, वैद्यकीय अधिकार्यांची ११, परिसेविकांची ५०, अधिपरिचारिकांची ३४३ तर वर्ग तीन व चारची पदेही भरली जाणार होती. परंतु गेल्या दोन वर्षात यावर काहीच झालेच नाही. उलट रुग्णालयात मोजकेच उपचार तेही ठाराविक वेळेसाठीच होत असल्याने एकेकाळी ७०० वर असलेला बाह्यरुग्ण विभाग आता केवळ ४०० वर आला आहे.
डॉ. आंबेडकर रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र क्ष-किरण, पॅथालॉजी व सोनोग्राफी विभागातून रुग्ण सेवा दिली जात आहे. हे रुग्णालय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिपत्याखाली सुरू आहे. परंतु डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने यातील एक जरी रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित होते. (प्रतिनिधी)

औषध व सोयींचा तुटवडा

मेयोच्या देखरेखेखाली हे रुग्णालय सुरू असलेतरी डॉक्टरांची चमू ही आरोग्य विभागाची आहे. मेयोत औषधांचा तुटवडा असल्याने या रुग्णालयासाठी औषधे उपलब्ध करून देणे अडचणीचे जात आहे. रुग्णालयात ईसीजी मशीन नाही.मोजक्याच चाचण्या होतात. एक्स-रेचा तुटवडा राहत असल्याने रुग्णांना मेयोत पाठविले जाते. या रुग्णालयाला घेऊन रोष व्याप्त आहे. जिल्हा रुग्णालय येथे झाल्यास या सर्व अडचणी सुटण्याची शक्यता आहे.

Web Title: Dr. Ambedkar Hospital waiting for development