शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील जिल्ह्यांच्या डीपीसीला सोमवारी मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हास्तरावर पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांना (डीपीसी) मंजुरी देण्याबाबतची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हास्तरावर पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांना (डीपीसी) मंजुरी देण्याबाबतची राज्यस्तरीय बैठक येत्या सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार हे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचा डीपीसीचा आढावा घेतली. त्यानंतर मंजुरी प्रदान केली जाईल.

सोमवारी दुपारी ३ ते ६ यादरम्यान होणाऱ्या बैठकीत विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा अशा अनुक्रमाने जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल. निधीवाटप सूत्रानुसार राज्य शासनामार्फत २०२१-२२ या आर्थिक वर्षात नागपूर जिल्ह्यासाठी २४१.८६, वर्धा ११०.७६, भंडारा ९४.१८, चंद्रपूर १८०.९५, गडचिरोली १४९.६४, गोंदिया १०८.३९ काेटी रुपये अनुज्ञेय नियतव्यय आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्याने आपला नियतव्यय जिल्हास्तरीय बैठकीत निश्चत केला आहे. नागपूर जिल्ह्याने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी एकूण ८८४.९० कोटींची मागणी केली आहे. जिल्ह्यासाठी ४११ कोटींची मर्यादा असून, जिल्हा नियोजन समितीने राज्य शासनाकडे ४७३ कोटींची अतिरिक्त मागणी केली आहे. राज्यस्तरीय मर्यादा २४१.८६ कोटी आहे. या बैठकीला गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, वर्धाचे पालकमंत्री सुनील केदार, भंडाराचे पालकमंत्री डाॅ. विश्वजित कदम आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह विदर्भातील जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. जिल्ह्यांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधी करतील.

------------------