शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

डब्बा व्यापाराची एसआयटी चौकशी

By admin | Updated: May 19, 2016 02:36 IST

डब्बा व्यापार प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाने स्पेशल इन्व्हेस्टिगेटीव्ह टीम (एसआयटी) गठित केली आहे.

सध्या सीबीआयला प्रकरण सोपविलेले नाही : तपासात बाहेरच्या संस्थांची मदत घेणार नागपूर : डब्बा व्यापार प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाने स्पेशल इन्व्हेस्टिगेटीव्ह टीम (एसआयटी) गठित केली आहे. यात तपासाशी संबंधित असलेले वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. चौकशीसाठी लेखा परीक्षक, आयकर विभाग, शेअर मार्केटमधील तज्ञांसह इतर संबंधित संस्थांची मदत सुद्धा घेतली जाईल. आजार जुना आहे. त्यामुळे त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती संयुक्त पोलीस आयुक्त राजवर्धन यांनी दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात नागपूर पोलीस पूर्णपणे सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सीबीआयकडून चौकशी करण्याच्या प्रश्नावर राजवर्धन म्हणाले, याबाबत राज्यसरकारच निर्णय घेऊ शकते. परंतु एसआयटी यासाठी सक्षम आहे. डब्बा व्यापार कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे. यात कुठल्या प्रकारची ‘मोडस अप्रेंडी’चा उपयोग केला गेला. किती चल अचल संपत्ती जमविली गेली. आदी अनेक बाबींवर तज्ञांची मदत घेत तपासात पुढे जाऊ. नुकत्याच झालेल्या धाडीनंतर अटक झालेल्या आरोपींचा पीसीआर वाढविण्यासंबंधी त्यांनी सांगितले की, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर अतिरिक्त विचारपूस करायची असेल आणि त्यांना आरोपींची कोठडी आणखी काही दिवस वाढवायची असेल तर ते तशी कारवाई करू शकतात. डब्बा व्यापारातील आरोपी रवी अग्रवाल याचे काही पोलीस अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांबाबत विचारले असता, आरोपी पकडले गेल्यावर विचारपूस केली जाईल. या आधारावर निष्पक्षपणे कारवाई केली जाईल. फोन कॉल्स, आर्थिक व्यवहारासह विविध बाबींच्या चौकशीबाबत त्यांना विचारले असता राजवर्धन यांनी सांगितले की, चौकशीची संबंधित माहितीचा सध्या खुलासा करता येऊ शकत नाही. चौकशीसोबतच आरोपींचे बँक अकाऊंट गोठविले जाऊ शकतात. डब्बा व्यापाराशी संबंधित लोकांनी काळा पैसा दुप्पट, तिप्पट करण्यासाठी व्यवस्थेला मात देत कसा व्यवसाय केला. ब्लॅक मनीला धंद्यात लावणारे कोण आहेत, याचा पत्ता लावला जाईल. हा व्यापार देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. ईडी (प्रवर्तन निदेशालय) आणि इतर संबंधित संस्थांसोबत पोलीस माहिती एकत्र करीत आहेत. (प्रतिनिधी)वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू डब्बा व्यापाराची चौकशी करण्यासाठी गठित एसआयटी ही पोलीस उपायुक्त रंजनकुमार आणि दीपाली मासिरकर यांच्या देखरेखेखाली काम करेल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे या चमूचे नेतृत्व करतील. त्यांच्या नेतृत्वाखील सुद्धा अनेक वरिष्ठ व अनुभवी अधिकारी व कर्मचारी काम करतील. आर्थिक गुन्हे प्रकरणात पोलीस कमजोर पोलीस विभागात आर्थिक गुन्हे शाखा आहे. परंतु या शाखेत फाईल आणि आकडे नोंदविण्यापलीकडे फारसे काम होताना दिसून येत नाही. पोलिसांची ही शाखा सक्षम असती तर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या धंद्याची त्यांना आजवर माहिती का मिळाली नाही. पोलिसांकडे आर्थिक क्षेत्राशी संबंधित तज्ञ नसल्याची बाब राजवर्धन यांनी मान्य केली. अशा प्रकरणात बाहेरील तज्ञांची मदत घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले. समर्पण शक्य नुकत्याच झालेल्या काही जणांच्या अटकेनंतर डब्बा व्यापारात काही नावं पुढे आली आहेत. त्यामुळे अनेक आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. सूत्रानुसार पाेिलसांचा फास आवळला जात असल्याने काही व्यापारी समर्पण करीत शरण येऊ शकतात. यानंतर अनेक नवीन पुरावे भेटू शकतात. देशात या व्यापाराचे मोठे जाळे पसरले असल्याचेही सांगितले जाते.