१६ निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना ३ कोटी ५७ लाख वितरित

By Admin | Updated: January 3, 2016 03:38 IST2016-01-03T03:38:11+5:302016-01-03T03:38:11+5:30

सेवानिवृत्तीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम देण्याची प्रथा कायम ठेवून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक ..

Distribution of 3 crore 57 lakhs to 16 retired railway employees | १६ निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना ३ कोटी ५७ लाख वितरित

१६ निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना ३ कोटी ५७ लाख वितरित


नागपूर : सेवानिवृत्तीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम देण्याची प्रथा कायम ठेवून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या अध्यक्षतेखाली १६ रेल्वे कर्मचाऱ्यांना ३ कोटी ५७ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम वितरित केली.
डीआरएम कार्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात निवृत्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, सेवाप्रमाणपत्र, आरोग्य पुस्तिका, स्वर्णजडित रजत सेवा पदक प्रदान केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करून सुखी जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले. सेवानिवृत्तीनंतर आपला वेळ सामाजिक कार्यात देण्याचे आवाहन त्यांनी केले. आभार मंडळ कार्मिक अधिकारी आर. गणेश यांनी मानले. यावेळी अप्पर रेल्वे विभागीय व्यवस्थापक डी. सी. अहिरवार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी हफीज मोहम्मद, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता वाय. एस. बोकडे, सहायक सुरक्षा आयुक्त ए. एम. किसकु उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of 3 crore 57 lakhs to 16 retired railway employees