शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनर्थ टळला; ... नाहीतर नागपूरचेही नाशिक झाले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:28 IST

Coronavirus in Nagpur news; राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरमधील ऑक्सीजन सिलिंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी रुग्णांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे इस्पितळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देकोविड सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाडप्रशासनात प्रचंड खळबळ तातडीने केली दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरमधील ऑक्सीजन  सिलिंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी रुग्णांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे इस्पितळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे पथक तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी तातडीने बिघाड दुरुस्त करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.राजभवनाच्या बाजूला  आयुष हॉस्पिटल मध्ये नुकतेच हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे ४५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दुपारी ४.३० च्या सुमारास ऑक्सिजनचा सर्वत्र गंध पसरल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांत कुजबुज सुरू झाली. त्यानंतर काही रुग्णांना ऑक्सिजन सुरळीत मिळत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या ध्यानात आले. त्यामुळे येथे एकच धावपळ निर्माण झाली. ऑक्सीजन गळती सुरु झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे ती प्रशासनाच्या कानावरही गेली. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरची दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे एक पथक, अग्निशमन दल तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला ऑक्सीजन सिलेंडर मधील मुख्य कॉक बिघडल्याने वायुगळती सुरू झाल्याचे तज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच या बिघाडाची दुरुस्ती केली आणि ऑक्सीजन प्रणाली सुरळीत केली. खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमधील सर्व सिलेंडरची तपासणी करून ते व्यवस्थित आहेत की नाही, त्याचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्धा ते पाऊण तास दुरुस्ती करणारे पथक रुग्णालयातच थांबले. सर्व काही व्यवस्थित असल्याचे ध्यानात आल्यामुळे या पथकाने रुग्णालयातून सोडले. नाशिकची पुनरावृत्ती टळलीनाशिकच्या घटनेमुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. अशात ही घटना घडल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकच नव्हे तर रुग्णालय प्रशासनात आणि जिल्हा प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली होती. घटनास्थळावरून रुग्णांना हलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ॲम्बुलन्सही बोलवण्यात आल्या होत्या. सुदैवाने नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस