शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित

By admin | Updated: May 14, 2014 01:29 IST

अवकाळी पाऊस व वादळाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. १५ एप्रिल २0१४ पर्यंंत नुकसानभरपाई देण्याचे शासनाने परिपत्रक काढले.

बाबा टेकाडे - सावनेर

अवकाळी पाऊस व वादळाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदतीचा हात दिला. १५ एप्रिल २0१४ पर्यंंत नुकसानभरपाई देण्याचे शासनाने परिपत्रक काढले. याबाबत अधिकार्‍यांना बजविण्यात आले. मात्र, प्रशासन आणि बँकेच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही शेकडो शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांत संताप व्यक्त होत आहे.

सावनेर तालुक्यात अवकाळी व वादळासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संत्रा, मोसंबी, कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. लाखो रुपयांचे हातचे पीक गेल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. कर्जबाजारी शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला.

अशा परिस्थितीत आदर्श आचारसंहिता लागू असतानाही शासनाने निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेऊन नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. शेतकर्‍यांच्या खात्यात १५ एप्रिलपावेतो नुकसानभरपाई जमा करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले. अन्यथा रक्कम परत करावी, असाही परिपत्रकात उल्लेख आहे. परंतु शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालय व बँकेच्या चकरा मारत आहेत.

विशेष म्हणजे ४२0 लाभार्थ्यांंचा २७ लाख रुपयांचा धनादेश बँकेच्या हलगर्जीपणामुळे गहाळ झाला. याबाबत एचडीएफसी बँकेने काहीच गंभीरतेने दखल घेतली नाही. तद्वतच तहसील कार्यालयासही कळविले नाही. शेतकरी बँकेचे हेलपाटे मारत होते. अद्याप नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा का झाली नाही, अशी ओरडही झाली. त्यामुळे खळबळ माजली. तहसील कार्यालयातून एचडीएफसी बँकेत वारंवार फोनने संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी नागपूर येथील बँकेत गेले. त्यावेळी नुकसानभरपाईचा २७ लाख रुपयांचा धनादेश गहाळ झाल्याची बाब निदर्शनात आली.

त्यानंतर १५ एप्रिल २0१४ ला पुन्हा दुसरा धनादेश तयार करून बँकेला दिला. तरीदेखील शेतकर्‍यांना रक्कम मिळाली नाही. परिणामी शेतकर्‍यांचे बँक व तहसील कार्यालयातील हेलपाटे सुरूच आहेत.