शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:52 IST

स्वत:च्या शेतातील आऊट हाऊसमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक अशोक जयस्वाल (वय ५०) याच्या मंगळवारी रात्री नंदनवन पोलिसांनी मुसक्या बांधल्या.

ठळक मुद्देरेल्वेस्थानक मार्गावर बांधल्या मुसक्या : नंदनवन पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या शेतातील आऊट हाऊसमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक अशोक जयस्वाल (वय ५०) याच्या मंगळवारी रात्री नंदनवन पोलिसांनी मुसक्या बांधल्या.एका सामाजिक संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला आरोपी जयस्वाल एका शिक्षण संस्थेचा संचालक आहे. त्याने मध्य प्रदेशातील शिवनी येथील एक महिला, तिची १५ आणि १७ वर्षांची मुलगी तसेच २० वर्षांचा मुलगा या चौघांना स्वत:च्या शेतातील आऊट हाऊसमध्ये ठेवले होते. ऑक्टोबर २०१६ पासून त्याने १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ सुरू केला. त्याने एकदा हैदराबादला नेले आणि तेथे तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. तिला बदनामीचा तसेच मारण्याचा धाक दाखवून गप्प राहण्यास बजावले होते. मुलगी गप्प बसल्याने निर्ढावलेला जयस्वाल वारंवार पीडित मुलीवर बलात्कार करू लागला. तिच्यानंतर त्याने आपली विकृत नजर तिच्या लहान बहिणीवर (वय १५) वळवली. तिला कार्यालयात बोलवून तो तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. हा प्रकार १० सप्टेंबरला उघड झाला. त्यामुळे नंदनवन पोलिसांनी जयस्वालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून तो फरार होता. अटक टाळण्यासाठी जयस्वालने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. आधी जिल्हा आणि नंतर उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. दरम्यान, तो आज रात्री मध्य प्रदेशमधून बसने नागपुरात येणार असल्याचे कळताच, ठाणेदार विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला. रात्री १०.४५ च्या सुमारास तो मध्य प्रदेश बसस्थानकावर दिसताच नंदनवन पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारArrestअटक