शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis : "...मग देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने लस कशी काय घेतली?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 23:39 IST

Devendra Fadanvis : काँग्रेसचा हल्लाबोल : सामान्यांच्या जीवाची किंमत नाही का?

ठळक मुद्दे‘लोकमत’ने तन्मय फडणवीस यांचे वडील अभिजित फडणवीस यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही व त्यानंतर त्यांचा फोन ‘स्वीच ऑफ’ होता.

नागपूर : एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. त्यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो ‘व्हायरल’ झाला आहे. त्यांचे वय ४५ च्या वर नसतानादेखील त्यांना लस कशी काय मिळाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट असतानादेखील फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळाली. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने ‘टि्वटर’वर उपस्थित केला.

यासंदर्भात ‘लोकमत’ने तन्मय फडणवीस यांचे वडील अभिजित फडणवीस यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही व त्यानंतर त्यांचा फोन ‘स्वीच ऑफ’ होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर