शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
4
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
5
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
6
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
7
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
8
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
9
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
10
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
11
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
12
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
13
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
14
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
15
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
16
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
17
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
18
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
19
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
20
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी असूनही पाणीटंचाई कशी ?

By admin | Updated: May 16, 2014 00:53 IST

नागपूर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने ओसीडब्ल्यूकडे (ऑरेंज सिटी वॉटर) जबाबदारी सोपविली. मात्र, त्यानंतरही पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत.

नागपूर : नागपूर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने ओसीडब्ल्यूकडे (ऑरेंज सिटी वॉटर) जबाबदारी सोपविली. मात्र, त्यानंतरही पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. पदाधिकार्‍यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याची महापौर अनिल सोले यांनी गंभीर दखल घेतली असून ओसीडब्ल्यूवर नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर जलकुंभांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश वर्षभरापूर्वी देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे ओसीडब्ल्यूला नोटीस बजावण्याचे निर्देश महापौरांनी एनईएसएलला दिले आहेत.

शहरात ज्या भागात जलवाहिन्यांचे जाळे आहे, तेथे कुठल्याही कारणाने टंचाई निर्माण झाली तर नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूवर आहे. परंतु ओसीडब्ल्यूने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडलेली नाही. महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एनईएसएल (नागपूर एन्व्हायर्नमेन्टल सर्व्हिसेस लि. ) ची बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाल येथील किल्ला भागात जलकुंभ बांधकाम सुरू करण्याबाबत वर्षभरापूर्वी ओसीडब्ल्यूला निर्देश देण्यात आले होते. परंतु वर्षभरात ओसीडब्ल्यूने या निर्देशाकडे डोळेझाक केली. त्यामुळे या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ओसीडब्ल्यूने या बांधकामाला अद्यापही सुरु वात न केल्याबाबत महापौर चांगलेच संतप्त झाले. त्यांनी ओसीडब्ल्यूला नोटीस देऊन यावर स्पष्टीकरण मागण्याचे निर्देश एनईसीएलला दिले.

बोरियापुरा प्रभागात मेन फिडर लाईनवरील व्हॉल्व हाताळताना असामाजिक तत्त्वाचा त्नास असल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला. असामाजिक तत्त्वांचा विरोध मोडित काढा तसेच या परिसरात नवीन जाळे टाकण्यास विरोध करणार्‍यांची गय न करता कामे करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. या संदर्भात तातडीने आयुक्तांनी बैठक घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. या बैठकीत जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अजीजूर रहमान उपस्थित होते. (प्रतिनिधी)