शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूची माफक दरात तपासणी

By admin | Updated: November 6, 2015 04:20 IST

महापालिकेच्या महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती रोगनिदान केंद्रात एलायझा मशीन बसविण्यात आली

नागपूर : महापालिकेच्या महाल येथील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती रोगनिदान केंद्रात एलायझा मशीन बसविण्यात आली असून येथे डेंग्यूची माफक दरात तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना याचा लाभ होईल, असा विश्वास महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी व्यक्त केला. एलायझा मशीनचे लोकार्पण दटके व आमदार विकास कुंभारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दटके बोलत होते. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, गांधीबाग झोनच्या सभापती प्रभा जगनाडे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यूची तपासणी करण्याची सुविधा आहे. परंतु या दोन्ही महाविद्यालयात विदर्भ व शेजारच्या भागातील सिरम सॅम्पल तपासण्यासाठी येतात. त्यामुळे तपासणी अहवालाला विलंब होतो. आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून आठ लाखांचा निधी या मशिनसाठी उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे एलायझा मशीन लावणे शक्य झाल्याचे दटके म्हणाले. मेयो, मेडिकल रुग्णालयात रुग्णांवर चांगले उपचार होतात. परंतु रुग्णांना शासनाच्या योजनांची माहिती नाही. त्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात जातात. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केन्द्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी रुग्णांच्या उपचाराकडे विशेष लक्ष देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी १ ते ५ वयोगटातील बालकांवर कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा केली असल्याची माहिती विकास कुंभारे यांनी दिली.यावेळी आरोग्य समितीचे सभापती देवन्द्र्रे मेहर,परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस, जयश्री वाडीभस्मे, सारिका नांदूरकर, लता यादव, शीतल घरत, राजेश घोडपागे, अतिरिक्त आयुक्त नयना गुुंडे , मनोज साबळे, डॉ. स्वाती मटकरी, डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. जयश्री धोटे, झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थित होते. संचालन डॉ. नरेन्द्र बर्हिरवार यांनी तर आभार डॉ. विजय जोशी यांनी मानले.(प्रतिनिधी)डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यूडेंग्यूमुळे गेल्या वर्षात व यावर्षी प्रत्येकी एक अशा दोनजणांचा मृत्यू झाला. यावर्षी १६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.