शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

‘५०-५०’ परीक्षा प्रणालीबाबत आज निर्णय

By admin | Updated: June 6, 2017 02:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम’ असलेली ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली यंदापासून लागू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.

नागपूर विद्यापीठ : महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बोलविली बैठकलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम’ असलेली ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली यंदापासून लागू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. याची नियमावलीदेखील लवकरच तयार होणार आहे. मात्र या प्रणालीला शहरी भागातील अनेक महाविद्यालयांकडून विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने गैरव्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांची मंगळवारी बैठक बोलाविली आहे. या परीक्षा प्रणालीबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली प्रशासनासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यातच पदवी अभ्यासक्रमांनादेखील सत्र प्रणाली लागू झाल्यामुळे परीक्षा विभागावरील ताण प्रचंड वाढला आहे. हा ताण कमी व्हावा यासाठी महाविद्यालयांतदेखील परीक्षा सुरू करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत्त परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला. याला मंजुरी देण्यात आली होती. या प्रणालीत एका सत्राची परीक्षा विद्यापीठ तर एका सत्राची परीक्षा महाविद्यालय घेणार आहे. विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल हा विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवर ठरणार असल्याने गैरप्रकारांना आळा बसणार आहे. मात्र संबंधित प्रणालीमुळे महाविद्यालयांवरील ताण वाढणार आहे. ‘सेशनल’ परीक्षा घेतल्यानंतर महाविद्यालयांना संबंधित परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना दुप्पट काम करावे लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांकडून या प्रणालीला विरोध करण्यात येत आहे. विशेषत: गैरव्यावसायिक महाविद्यालयांकडून नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात नेमका तोडगा काढण्यासाठी व परीक्षेची अंतिम रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी दुपारी प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्रप्रणाली, परीक्षा पद्धती यांच्यासोबतच परीक्षेची नेमकी ‘स्कीम’ इत्यादींबाबत चर्चा होईल. मंगळवारी याबाबत निर्णयदेखील होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.