शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या प्रकरणावर १४ वर्षांनंतर निर्णय

By admin | Updated: November 3, 2015 03:36 IST

तांबेखणी (उमरेड) येथील एका खुनाच्या प्रकरणावर १४ वर्षांनंतर निर्णय आला आहे. नागपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश

नागपूर : तांबेखणी (उमरेड) येथील एका खुनाच्या प्रकरणावर १४ वर्षांनंतर निर्णय आला आहे. नागपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.व्ही. दीक्षित यांनी गेल्या शनिवारी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली आहे. हे आरोपी एकाच कुटुंबातील आहेत.सुधाकर, मधुकर, बबन, गोविंदा, वेणूबाई व कचराबाई चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. पुरुषोत्तम नागोसे असे मृताचे नाव असून ते जाटतरोडी, नागपूर येथील रहिवासी होते. सरकारी पक्षानुसार, लोणबैले व चौधरी परिवारामध्ये शेतीवरून वाद होता. २० जून २००१ रोजी लोणबैले परिवारातील सदस्यांनी पुरुषोत्तम (लोणबैले परिवाराचे जावई) यांना सोबत घेऊन शेतात वखरणी सुरू केली होती. चौधरी परिवाराने त्यावर आक्षेप घेतला. यामुळे दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, कुऱ्हाडीने मारण्यात आल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पुरुषोत्तम यांचा मृत्यू झाला. शेषराव व मोहन लोणबैलेही गंभीर जखमी झाले तसेच चौधरी परिवारातील सुधाकरला भाल्याने भोसकण्यात आले होते. यानंतर दोन्ही परिवारांनी उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौधरी परिवारातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३२४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नोंदविला होता. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रशीदा बेगम व जखमी साक्षीदार मोहन यांच्यासह एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. आर. बी. गायकवाड व अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)