नागपूर : नागपूर शहर बॉम्ब शोधक व नाशक पथकातील शेरा या श्वानाचा रविवारी सकाळी आजाराने मृत्यू झाला. गेल्या ९ वर्षांपासून तो या पथकात कार्यरत होता. शेराला डिस्प्लेसिया नावाचा आजार झाला होता. नागपुरातील व्हेटरनरी कॉलेज येथे गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. गेल्या ३० डिसेंबरपासून तो आजारी सुट्यावर होता. शेराने आपल्या ९ वर्षाच्या प्रदीर्ष सेवेत अनेक मोहीम यशस्वी केल्या. अँटी सेबोटेज चेक, व्हीआयपी बंदोबस्त,मर्म स्थान व इतर सुरक्षेचे काम सक्षमतेने पार पाडले. महाराष्ट्र राज्य स्तरावर २०१८ साली झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस श्वान स्पर्धेत शेराने तिसरा क्रमांक पटकावला होता. शेराला हाताळण्याचे काम पोलीस शिपाई अभिषेक कश्यप व राजेंद्र वानखेडे हे करीत होते. शेेरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बॉम्ब शोधक पथकातील ‘शेरा’चा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST
नागपूर : नागपूर शहर बॉम्ब शोधक व नाशक पथकातील शेरा या श्वानाचा रविवारी सकाळी आजाराने मृत्यू झाला. गेल्या ९ ...
बॉम्ब शोधक पथकातील ‘शेरा’चा मृत्यू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}