शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

‘डे टू डे’ चालणार खटला

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्याची सुनावणी ८ जानेवारीपासून प्रधान जिल्हा

पहिल्या दिवशी १० साक्षीदार : उद्यापासून सुनावणीनागपूर : संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्याची सुनावणी ८ जानेवारीपासून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात प्रारंभ होत आहे. ८ ते १८ जानेवारीपर्यंत हा खटला ‘डे टू डे’ सुरू राहणार आहे. सरकार पक्षाने न्यायालयाला एकूण ७५ साक्षीदारांची यादी सोपवली असून पहिल्या दिवशी १० साक्षीदारांची साक्ष तपासली जाणार आहे. राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना त्याचा मित्र अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, या दोन आरोपींविरुद्ध हा खटला चालणार आहे. तिसरा आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असून त्याच्याविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालणार आहे. केवळ थरकापच१ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चिमुकला युग शाळेच्या बसमधून उतरताच ‘मम्मी हॉस्पिटल में बुला रही है’, अशी थाप मारून त्याचे स्कूटीने अपहरण करण्यात आले होते. युग हा सेंटर पॉर्इंट शाळेचा दुसऱ्या इयत्तेचा विद्यार्थी होता. त्याचे वडील डॉ. मुकेश चांडक दंत चिकित्सक असून त्यांचे दोसरभवन चौकात क्लिनिक आहे. अपहरणाच्या दिवशीच दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा निर्घृण खून करण्यात आला होता. मुख्य आरोपी राजेश याने २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता कबुली देऊन मृतदेह काढून दिला होता. मृतदेह रेतीने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय शवविच्छेदन अहवालात आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर २६ जखमा होत्या. आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन खान असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयाची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव सांगितले नव्हते. ‘युग हमारे कब्जे मे है, ५ करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आना’, असेही त्याने म्हटले होते. या प्रकरणाचा तपास लकडगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी केलेला आहे. त्यांनीच आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने हा खटला अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला साहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा लढत आहेत. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड.मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)